20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

…..त्यासाठी शेतकऱ्याच्या पोटी जन्म घ्यायला हवा !

…..त्यासाठी शेतकऱ्याच्या पोटी जन्म घ्यायला हवा !

शेतकरीमित्र शब्दावरून बजरंग सोनवणेंनी फटकारले

हनुमंत गव्हाणे: बीड /केज :- शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारी यांचे दुःख समजायला शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घ्यायला पाहिजे ज्यांना शेत आणि शेतकरी काय हे समजले नाही. त्यांना शेतकरी पुत्र आणि मित्र यातील फरक काय हे कसे कळणार ? असा प्रश्न करत बजरंग बप्पा सोनवणे यांनी भाजपच्या उमेदवाराला चांगलेच फटकारले आहे

बीड व शिरूरकासार येथे बैठकांदरम्यान विरोधी उमेदवाराच्या भाषणाचा समाचार घेताना बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले कि
ज्याच्या घरात कुणी साधे ग्रामपंचायत सदस्य न्हवते त्या गरीब शेतकरी कुटूंबात मी जन्माला आलो. म्हणून मी शेकतकरी पुत्र आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. मात्र जे जन्मताच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आले त्यांना शेतकऱ्याचे आणि त्याच्या मुला-बाळांचे कष्ट, दुःख, वेदना कसे कळणार ? असा प्रश्न बजरंग बप्पा सोनवणे यांनी भाजपच्या उमेदवाराला केला आहे. तसेच शेतकरी पुत्र नव्हे तर शेतकरी मित्र व्हायला हवे. असे विरोधी उमेदवार करत असलेल्या चर्चेवर सणसणीत चपराक लगावत ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा आणि त्याने कष्टाने पिकविलेल्या उसाला रास्त भाव मिळावा म्हणून मी येडेश्वरी साखर कारखाना उभा केला. त्याच्या माध्यमातून आपण मराठवाड्यात ऊसाला सर्वाधिक भाव दिला आणि बेरोजगारांच्या हाताला काम दिले. म्हणूनच मी शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे. परंतु ज्यांनी शेतकरी व कामगार यांचे पैसे बुडवून लबाडी केली आणि आपल्या पित्याने उभारलेला साखर कारखाना बंद पाडला. ते शेतकरी आणि बेरोजगारांचे शत्रु आहेत. असा घणाघात त्यांनी केला.
तसेच ज्यांना शेत आणि शेतकरी हेच कळत नाही त्यांना शेतकरी पुत्र कसे कळणार ? ज्या सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव देण्या ऐवजी निर्यात बंदी करून देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादित सोयाबीन, कांदा, कापूस या पिकांना रास्त भाव मिळू नये म्हणून बाहेर देशातून माल आयात केला. त्या पक्षाच्या उमेदवाराला शेती आणि शेतकरी याची समज असूच शकत नाही त्यामुळे या निवडणुकीत अशा लोकांना धडा शिकवावा असे आवाहन त्यांनी केले

 

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या