19 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

बीड जिल्ह्यातील ओबीसी जनतेने ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहवे – प्रा.टी.पी.मुंडे

बीड जिल्ह्यातील ओबीसी जनतेने ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहवे – प्रा.टी.पी.मुंडे

यशवंत अण्णा गायके हे ओबीसी बहुजन पार्टीचे बीडचे उमेदवार म्हणून जाहीर!

ओबीसी जागा हो यशवंत अण्णा यांना निवडून आणण्याचा धागा हो ! असे केले आवाहन !

बीड जिल्हा प्रतिनिधी

ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आरक्षणासाठी ओबीसी बहुजन पार्टी ची स्थापना झाली असून बीड येथून यशवंत अण्णा गायके यांची उमेदवारी जाहीर केली ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी बीड येथील नीलकमल हॉटेल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उमेदवारी जाहीर केली. ओबीसी, व्हिजे एन टी, एससी एसटी विमुक्तभटके जाती जमाती बारा बलुतेदार,आलुतेदार यांनी ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून लोकसभेत पाठवावे. उठ ओबीसी जागा हो यशवंत अण्णा यांच्या विजयाचा धागा हो असे आवाहन बीड जिल्ह्यातील जनतेला त्यांनी केले.

ओबीसी बहुजन पार्टीने राज्यात 14 जागावर उमेदवार दिले असून सात जागांवर जाहीर पाठिंबा दिला आहे. बीडमध्ये यशवंत अण्णा यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या काही लोकांनी जाळपोळ केली या जाळपोळीमध्ये ओबीसी समाजाचे नेत्यांना टार्गेट करण्यात आले. आमदारांची घरी जाळण्यात आली. हॉटेल जाळण्यात आले. या जाळपोळीची पाहणी आमचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी केल्यानंतर अंबड मधून ओबीसीचा एल्गार पुकारला आणि ओबीसीच्या आरक्षणासाठी लढा उभारला. ओबीसी संकटात असताना, ओबीसीची 22 मेळावे झाले तरी जिल्ह्यातील ओबीसी नेते कुठे होते असा सवाल त्यांनी केला.

बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. बीड जिल्ह्याच्या ऊसतोड कामगाराचा आणि ओबीसीचा गेल्या पंचवीस वर्षांमध्ये कसल्याही प्रकारचा विकास झाला नाही त्यामुळे बीड जिल्ह्याची जनता ही ओबीसीच्या उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एल्गार मेळाव्या मधून लोकांची मागणी होती की ओबीसीचा स्वतंत्र पक्ष असला पाहिजे आम्ही कोणाला मतदान करावे त्यामुळे या मागणीचा विचार करून ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना करण्यात आली आहे. मराठा समाज जाणून बुजून ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसू पाहत आहे. बीड जिल्ह्यातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा उमेदवार कटीबद्ध आहे त्यासाठी ओबीसीने एकत्र येण्याची गरज आहे त्यामुळे ओबीसीच्या उमेदवाराला साथ देऊन लोकसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे.

यावेळी ओबीसी बहुजन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष भीमराव मुंडे, जिल्हाध्यक्ष विनायकराव गडदे, ओबीसी बहुजन पार्टीचे बीड जिल्ह्याचे उमेदवार यशवंत अण्णा गायके, परळी तालुका अध्यक्ष सूर्यकांत मुंडे, उपाध्यक्ष माणिकराव सलगर , डॉ.भगवानराव सरवदे आदी उपस्थित होते

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या