22 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक आणा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ ग्रा.सदस्या सौ.सुमेधा कैलास फड उतरल्या मैदानात ; महिलाच्या काँर्नर बैठकीला प्रचंड प्रतिसाद

मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक आणा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ ग्रा.सदस्या सौ.सुमेधा कैलास फड उतरल्या मैदानात ; महिलाच्या काँर्नर बैठकीला प्रचंड प्रतिसाद

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

 

बीड लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व घटक पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ मंत्री ना. धनंजय मुंडे, वाल्मिक आणा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली बँक कॉलनी भागातील महिलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. महिलांनी एकजुटीने आपल्या सर्वांचे आशीर्वाद पंकजाताईंच्या पाठीशी आहेत. महिलांच्या कॉनर बैठकीस प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. हा प्रतिसाद विक्रमी मताधिक्य देणारा आहे असा विश्वास याप्रसंगी जिरेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत बँक कॉलनीच्या सदस्या सौ.सुमेधा कैलास फड यांनी व्यक्त केला. विकासाभिमुख नेतृत्वाला बहुमताने लोकसभेत पाठवण्यासाठी मतदानरुपी आशीर्वाद दया असे आवाहन सौ. फड यांनी याप्रसंगी केले.


बीड लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व घटक पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ बँक कॉलनी येथे स्वप्नपूर्ती निवास स्थान येथे राज्याचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते वाल्मिक आणा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी तालुक्यातील जिरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत बँक कॉलनी भागातील अयोध्या नगर, समतानगर, प्रियानगर भागातील महिलाची काँर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महिलाची या कॉर्नर बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मतदारांशी संवाद साधला. पंकजाताई मुंडे यांना आपल्याच भागातून मताधिक्य देण्यासाठी महिलानी एकजुटीने निर्धार केला. असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना मोठ्या प्रमाणात याभागातुन मतांची आघाडी मिळणार तसेच दि. १३ मे रोजी मतदानातून व्यक्त करून आपले आशीर्वाद पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे करा असे आवाहन सौ. सुमेधा कैलास फड यांनी यावेळी केले. याप्रसंगी महिला मंडळ यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच बँक कॉलनी भागातील अयोध्या नगर, समतानगर, प्रियानगर, महिलाना शासकीय योजनाचा लाभ मिळावा यासाठी आढावा बैठक संपन्न झाली. पंकजाताई मुंडे, मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक अण्णा कराड तसेच युवा नेते कैलास फड यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय योजनेचा लाभ व कुठल्याही प्रकारच्या प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटीबद्ध ग्रामपंचायत सदस्या सौ. सुमेधा कैलास फड यांनी सांगितले.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या