20.6 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मतदानरुपी अधिकार दिला —प्रा.टी.पी.मुंडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मतदानरुपी अधिकार दिला —प्रा.टी.पी.मुंडे

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मतदानरुपी अधिकार दिला —प्रा.टी.पी.मुंडे*

*पंचशील नगर येथे निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करून महामानवास केले विनम्र अभिवादन!*

परळी वैजनाथ प्रतिनिधी

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मतदानरुपी अधिकार दिला त्याचा वापर सदसद विवेक बुद्धीने लोकसभा निवडणुकीत करून आरक्षण वाद्याने आरक्षण वाद्यास मतदान करावे असे आवाहन ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 133 व्या जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण करून सकाळी अभिवादन केले पंचशील नगर येथील बौद्ध विहारात जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान त्यांच्याहस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न झाले तसेच जगाला शांतीचा संदेश देणारे बोधिसत्व गौतम बुद्ध व परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर ओबीसी बहुजन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष भीमराव मुंडे, जिल्हाध्यक्ष विनायकराव गडदे, प्रा. सुनीलजी पाखरे, रिपाइचे जिल्हा महासचिव दशरथ दादा शिंदे, दत्ता भाऊ सावंत, सुभाष वाघमारे, बाबासाहेब सोनवणे, चिकाटे मामा, मलकार वाघमारे श्याम गडेकर, परळी मार्केट कमिटीचे माजी उपसभापती प्रा.विजय मुंडे, मिलिंद क्षीरसागर,उबाळे ताई, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा जि.प. सदस्य प्रदीप भैय्या उर्फ बबलू शेठ मुंडे,भोपल्याचे सरपंच बाळासाहेब मुंडे,नवनाथ क्षीरसागर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात धम्म वंदनेने झाली. पंचशील नगर जयंती उत्सव समितीच्या वतीने वतीने प्रा.टी.पी.मुंडे सरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन वाघमारे यांनी केले तर प्रस्ताविक परळी मार्केट कमिटीचे माजी उपसभापती प्रा.विजय मुंडे यांनी केले.

भारतीय संविधान हे जगातील लिखित संविधान असून या संविधानामुळेच सर्वसामान्यांना अधिकार बहाल झाले आणि त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देशातील लोकशाही टिकून असून एक आदर्श लोकशाही जगासमोर उभी आहे. लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आपल्या मताचा अधिकार विवेक बुद्धीने वापरून आणि आर्थिक आमिषाला बळी न पडता आपला मतदान रुपी आशीर्वाद योग्य उमेदवाराच्या पाठीशी द्यावा. ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आपण अहोरात्र परिश्रम घेतले आणि आरक्षणाचा बचाव गेल्या 40 वर्षापासून शेतकरी शेतमजूर कष्टकरी ओबीसी दलित आदिवासी यांच्या हक्कासाठी आणि जिथे अन्याय होत असेल तेथे त्यांना न्याय देण्यासाठी लढलो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या 340 व्या कलमाद्वारे सर्वप्रथम ओबीसींना आरक्षण दिले. ओबीसी समाजाने एकत्र होणे गरजेचे संविधान अबाधित ठेवण्यासाठी ओबीसी दलित आदिवासी यांची एकजूट गरजेची आहे.घटनेच्या माध्यमातून मूलभूत तत्व मूलभूत हक्क सर्वसामान्यांना मिळाले म्हणूनच आज प्रत्येक जण आपल्या हक्कासाठी लढताना दिसत आहे हे केवळ संविधानामुळे आहे. सर्वसामान्य कष्टकरी शेतमजूर दलित यांना संविधानामुळेच जगण्याचे बळ मिळाले असे ते म्हणाले. तसेच घटनेच्या माध्यमातून सर्व समाजातील घटकांना न्याय मिळण्यासाठी कलमाद्वारे तरतूद त्यांनी केली आणि त्यांचे जीवन सुखमय केले तसेच बाबासाहेबांच्या विचारावर चालण्याची गरज आहे.

उपस्थितांचे स्वागत आणि सत्कार जयंती उत्सव कमिटीचे प्रवीण घाडगे, राहुल डुमणे ,विजय सरवदे,किरण जगताप, अण्णा सरवदे, बोधी कांबळे, अनिल सरवदे यांनी केले.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या