उदयनराजेंविरोधात अभिजीत बिचुकले रिंगणात
सातारा
बिग बॉस फेम अभिनेते अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) उदयनराजेंविरोधात रिंगणात उतरले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून बिचुकले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माध्यामांशी संवाद साधताना बिचुकले यांनी उदयनराजेंवर टीकास्त्र सोडले. तसेच, 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहितीदेखील यांनी यावेळी दिली. तसेच, खासदार म्हणून निवडून आल्यावर कोणती कामे करणार असल्याची घोषणादेखील त्यांनी यावेळी केली.
काय म्हणाले बिचुकले?
भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची उदयन दादांची इच्छा होती, ती पूर्ण झाली. पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी आणि लोकांनी पण करावे असा सल्ला बिचुकले यांनी दिला. शरद पवार आणि उदयनराजेंचं हाडवैर आहे. मी या सगळ्यांमध्ये एकटा लढतोय त्यामुळे यावेळी मला संधी द्या, असं आवाहनही बिचुकले यांनी यावेळी केलं.