2 C
New York
Saturday, January 18, 2025

Buy now

श्रीरामनवमी च्या दिवशी रामगडावर येता आले हा श्रीरामांचाच मला आशीर्वाद : पंकजाताई मुंडे

श्रीरामनवमी च्या दिवशी रामगडावर येता आले हा श्रीरामांचाच मला आशीर्वाद : पंकजाताई मुंडे

श्री क्षेत्र रामगडावर पंकजाताई मुंडेंनी घेतले मनोभावे दर्शन

*रामगडावरून हजारो भाविकांना दिल्या रामनवमीच्या शुभेच्छा*

*गडाचे महंत स्वामी योगीराज महाराजांच्या हस्ते पंकजाताईंचा सत्कार*

बीड | दिनांक १६।

जिल्ह्याची पालकमंत्री असताना श्रीक्षेत्र रामगडासाठी विकास कामे करता आली, असे असले तरी या गडावर आजपर्यंत येण्याची संधी मिळाली नाही परंतु आज श्रीरामनवमीच्या पावन पर्वादिवशी मला रामगडावर येऊन दर्शन घेता आले, हे प्रभू श्रीरामांचेच मी आशीर्वाद मानते, अशा शब्दांत भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

 

पंकजाताई मुंडे आज श्रीराम नवमीनिमित्त बीड तालुक्यातील क्षेत्र रामगड येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोपप्रसंगी गडाचे महंत स्वामी योगीराज महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाला आवर्जून उपस्थिती राहिल्या. याप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर श्रीक्षेत्र रामगडाचे महंत स्वामी योगीराज महाराज यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आदी मान्यवर आणि हजारोंच्या संख्येने महिला-पुरुष भाविक उपस्थित होते.प्रारंभी गडाचे महंत स्वामी योगीराज महाराज यांचा पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गडाच्या वतीने स्वामी योगीराज महाराजांनी पंकजाताईंचं स्वागत केलं.

यावेळी भाविकांशी संवाद साधताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, आज श्रीरामाचा जन्मोत्सव आहे. श्रीराम जन्मोत्सवाच्या मी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देते. रामगडाचे महंत योगीराज महाराजांच्या चरणी नतमस्तक होत असताना या गडावर दर्शनासाठी येता आले हे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. साक्षात प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा रामगड आहे. आजपर्यंत या गडावर येता आले नाही परंतु आज श्रीराम नवमीच्या दिवशी गडावर दर्शन घेता आले. हे मी माझे भाग्य समजते. प्रभू श्रीरामांचाच हा आशीर्वाद आहे असे त्या म्हणाल्या.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या