खामगावात ९० % मतदान
मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सिरसाळा अतुल बडे: बीड जिल्ह्यात सर्वत्र लोकसभा निवडणुक उत्साहाच्या वातावरणात पार पडली, शहरी भागापासून ते गाव खेड्यापर्यंत मतदारांनी सकाळी ७ ते सायं ६ वाजेपर्यंत मतदान केले . परळी तालुक्यातील सिरसाळ्या नजीक असलेल्या खामगाव या ठिकाणी ९० % मतदान झाले, ८१८ एवढी एकूण मतदार संख्या आहे. पैकी ७०१ एवढे मतदान झाले . बूथ केंद्र संख्या १ होती. खामगाव मुंडे घराण्याला मानणारे गाव आहे. दिवसभर शांततेत मतदान प्रकिया पार पडली, पोलीस बंदोबस्त देखील चोख होता . महायुतीचे पुढारी व कार्यकर्ते यांनी आपले उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्यासाठी खुप मेहनत घेतली. महाविकास आघाडी चे उमेदवार बजरंग सोनवणे यांची यंत्रणा या ठिकाणी दिसुन आली नाही.