20.9 C
New York
Tuesday, October 8, 2024

Buy now

लखमापुर फेस्टिवल येथे  गौरव गाथा महाराष्ट्राची कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

लखमापुर फेस्टिवल येथे  गौरव गाथा महाराष्ट्राची कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

 

संयोजकांच्या उत्कृष्ट संयोजना बहारदार कार्यक्रमाची ग्रामीण भागातील रसिकांना मेजवानी  

 

रेणापुर  ( अतुल्य महाराष्ट्र न्यूज )

महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोप पावू नये, आपल्या सांस्कृतीचा उजाळा मिळावा यासाठी लखमापुर फेस्टिवलच्या माध्यमातून व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गौरव गाथा महाराष्ट्राची या कार्यक्रमाचे लखमापूर येथे गुरुवारी दि . १६ मे रोजी आयोजन करण्यात आले होते. या झालेल्या बहारदार कार्यक्रमाने उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली.

प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही तालुक्यातील लखमापुर येथे माजी उपसरपंच महेश खाडप यांनी फेस्टिवलचे आयोजन व छत्रपती संभाजी महाराज ग्रामीण चषक २०२४ च्या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे गुरुवारी दि १६ मे रोजी आयोजन करण्यात आले होते . उद्घाटक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तथा कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव हे तर अध्यक्षस्थानी सदाशिव खाडप हे होते . सेवादल कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश सुर्यवंशी , वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड श्रीकांत सुर्यवंशी , माजी सैनिक शिरीष पाटील , पत्रकार सिद्धार्थ चव्हाण , पुण्यनगरीचे जेष्ठ पत्रकार धनंजय आरबुने , फुले शाहु आंबेडकर अभ्यासक भगवान साकसमुद्रे , दै अतुल्य महाराष्ट्रचे मुख्य संपादक संपादक नितीन ढाकणे , परळी मराठा स्वाभीमानी संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल सुर्यवंशी , बर्दापूरचे चेअरमन विश्वनाथ जाणकर , माजी चेअरमन नानासाहेब खाडप , व्हा चेअरमन संतोष धायगुडे, नवनाथ (राज ) खाडप , यांच्यासह आदिची उपस्थिती होती.

आयोजित गौरव गाथा महाराष्ट्राची यामध्ये बालाजी सुळ, कोतवाड ,राजन सरवदे, जान्हवी पाटील, प्रियंका बनसोडे, सुरज साबळे या कलाकारांनी गण गवळी या गितांने सुरुवात केली. त्यानंतर भूपाळी, ओवी, वासुदेव शेतकरी गीत, लोकगीत, अभंग, गौळण, , लावणी, पोवाडा असे लोक संगीतातील एकसे बडकर एक अस्सल गीत प्रकार सादर करून लखमापुर व परिसरातील रसिक श्रोत्यांचे डोळ्याचे पारणे फेडले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अरूण धायगुडे यांनी तर आभार महेश खाडप केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सूरज खाडप ,ओम खाडप, अवधूत खाडप, महादेव खाडप, नारायण धायगुडे,बळीराम खाडप,सुमित खाडप,दिपक खाडप,वैभव खाडप,नेताजी खाडप,अक्षय खाडप,दयानंद धायगुडे, दत्ता खाडप,गोट्या खाडप, गणेश खाडप,अतुल खाडप, तानाजी खाडप,विष्णु खाडप,सिद्राम इंगळे,लक्ष्मण भिसे, दिगंबर खाडप,पवन खाडप,दयानंद खाडप,प्रसाद खाडप, अशोक खाडप, आकाश धायगुडे, सुनील धायगुडे, दत्ता इंगोले, तात्या इंगोले,रमेश खाडप, सत्यजित खाडप, यश खाडप, विशाल धायगुडे, श्रीपाल खाडप, मारुती खाडप,अनिल खाडप,विशाल खाडप, किरण खाडप, रवी खाडप,अभिषक खाडप,गजानन खाडप अभिनंदन ससाणे, अविनाश ससाणे,रवी जाधव,अनंत जाधव,सुनील धायगुडे,बालाजी पांचाळ, विकास खाडप,सुधीर खाडप,श्रीराम (बाळू)खाडप विवेक खाडप,हनुमंत धायगुडे,गजानंद खाडप, मारुती खाडप,विष्णू खाडप,सोपान खाडप,दत्ता धायगुडे, भरत गिरी,ओम गोपाळ खाडप,माऊली धायगुडे,विशाल ससाणे,अमर ससाणे,प्रवीण ससाणे युवा मित्रमंडळाने परिश्रम घेतले.

लखमापुरचे माजी उपसरपंच महेश शिवाजी खाडप व संयोजन समिती च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज ग्रामीण चषक २०२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते गुरुवार दि. १६ रोजी करण्यात आले.


या झालेल्या स्पर्धेत सायगाव संघाने प्रथम क्रमांक पटकावत ५१ हजार रुपयाचे रोख बक्षीस व ग्रामीण चषक द्वितीय क्रमाचे लखमापुर संघाने ३१ हजार रुपये रोख व चषक तर तृतीय क्रमांचे पळशी येथील संघाने २१ हजार रुपये रोख व चषक मिळवले तसेच चौथ्या क्रमाकांचे डिकसळ येथील संघाने ११ हजार रोख व चषक मिळवले विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले.

 

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या