17.4 C
New York
Saturday, June 8, 2024

Buy now

spot_img

भरदिवसा तरुणीला लुटले !

🔶भरदिवसा तरुणीला लुटले !

मुंबई : वृत्तसंस्था

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीला भरदिवसा लुटल्याची घटना कल्याण पूर्वे येथील जे प्रभाग परिसरात घडली आहे. तरुणीचा अंगावर कॉस्टिक सोडा टाकून तिच्या हातातील लॅपटॉप असलेली बॅग हिसकावून चोरटे पसार झाले आहेत.भरदिवसा घडलेल्या या घटनेने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

अंजली पांडे, असं या पीडित तरुणीचं नाव आहे. ती युपीएससीचा अभ्यास करते. अंजली यूपीएससीच्या क्लासवरून कल्याण पुर्व येथे येत होती. त्याचवेळी जे प्रभाग परिसरात काही अज्ञातांनी तिच्या अंगावर कॉस्टिक सोडा टाकला. त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याचबरोबर काही वेळ तिला दिसेनासे झाले. याचाच अज्ञातांनी फायदा घेत तरुणीकडे असलेला बॅगेतील लॅपटॉप चोरी करून ते पसार झाले. दरम्यान थोड्यावेळाने या तरुणीने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात तक्रार दिली. सध्या तिला वैद्यकीय चाचणीसाठी कल्याणच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान हे चोरटे कोण होते? याचा पोलीस आता शोध घेत आहेत. मात्र रहदारीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या