4.9 C
New York
Sunday, January 19, 2025

Buy now

त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य “तिसरा वर्धापन” दिन सोहळा आष्टी येथे उत्साहात संपन्न

त्रिदल मुख्यालय व सैनिक विश्राम गृह उध्दाटन समारंभ.. भारत- पाक युद्धातील 1971चे महान योद्धे विश्वनाथ नेटके साहेब,सेना मेडल विजयते नारायण तळेकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले..!

  1. त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य “तिसरा वर्धापन” दिन सोहळा आष्टी येथे उत्साहात संपन्न

    प्रतिनिधी – सोपान पगारे

आष्टी येथे दि.5.1.2025 रोजी सकाळी 11 वाजता त्रिदल मुख्यालय व सैनिक विश्राम गृह उद्घाटन समारंभ त्रिदल सैनिक सेवा संघाचे *भारत- पाक युद्धातील1971चे महान योद्धे* विश्वनाथ नेटके साहेब,*सेना मेडल विजयते* नारायण तळेकर साहेब यांच्या हस्ते झाले.दुपारी 3 वाजता त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांचा तिसरा वर्धापन दिन आष्टी येथे साजरा करण्यात आला.

त्रिदल सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष यांचा इतिहास म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणाऱ्याचे उत्तम उदाहरण आहे एक छोट्या शेतकरी कुटुंबातून ते आलेले आहेत आणि आर्मी मध्ये 17 वर्षे देशसेवा करून घरी आलेत.

थोड्याच काळात म्हणजे चार-पाच वर्षात त्यांना सैनिकांना न्याय देण्यासाठी संघटित करण्याची ही कल्पना सुचली येथे माजी सैनिका वरती जे अन्याय होत आहेत त्यासाठी सैनिक संघटनेची स्थापना केली.त्यामुळे माजी सैनिक यांच्यावर जो शासकीय कार्यालयामध्ये अन्याय होत आहे जो माजी सैनिक दिवस रात्र देशाची सेवा करत होते त्या माजी सैनिकाला कुठेतरी चांगल्या प्रकारची वागणूक मिळेल या हेतूने या त्रिदल संघटनेची स्थापना करून माजी सैनिकाला न्याय मिळाला जेणेकरून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माजी सैनिकांचा कोणत्याही प्रकारचा अपमान होणार नाही व रखडलेली कामे पूर्ण व्हावीत या हेतूने या त्रिदल संघटनेची स्थापना केली या संघटनेमध्ये महाराष्ट्रातून 50 ते 60 माजी सैनिक सक्रिय आहेत.

आपण अहोरात्र लढणारे सैनिक एवढेच आहोत पण नक्कीच मी आपल्या सर्वांना विश्वास देतो की पुढल्या वर्षी वर्धापन दिनाच्या अगोदर सगळ्या महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने माजी सैनिक एकत्र काम करतील.

आजच्या त्रिदल संघ महाराष्ट्र राज्य यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश आण्णा धस यांना बोलवण्यात आले होते परंतु ते काही कामानिमित्त पुण्याला जावं लागल्यामुळे ते येऊ शकले नाही त्यांच्या जागी राधेश्याम धस हे उपस्थित होते.पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण पोकळे,पत्रकार शरद रेडेकर, लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य बीड जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब साबळे,पत्रकार रविंद्रनाथ ठाकूर, पत्रकार अशोक माने,पत्रकार अनिल मोरे यांची उपस्थिती होती.अंकुश खोटे हे पुढे बोलताना म्हणाले की त्रिदल संघटनेमार्फत सुरेश धस यांना आम्ही जाहीरपणे पाठिंबा देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचे आश्वासन दिले होते ते आश्वासन पूर्ण करून आण्णांना परत एकदा विधानसभेवर पाठवले आहे.तसेच भारत माता की जय व वंदे मातरम अशा घोषणा देत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे अध्यक्ष राधेश्याम धस,त्रिदल सैनिक संघटना संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंकुश खोटे,त्रिदल कोअर कमिटी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य संजीव फसले,त्रिदल उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महादेव खेडकर त्रिदल उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जमीर पठाण(उप-महाराष्ट्र केसरी),त्रिदल बीड जिल्हा अध्यक्ष महादेव बांगर, त्रिदल अहिल्यानगर मुख्यालय अध्यक्ष संजय मस्के,त्रिदल पुणे जिल्हा अध्यक्ष परशुराम शिंदे,त्रिदल अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष संदीप सांगळे,त्रिदल सातारा जिल्हाध्यक्ष दत्ता माळी,त्रिदल बीड जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कदम,त्रिदल करमळा तालुकाध्यक्ष अक्रूर शिंदे, त्रिदल बीड तालुकाध्यक्ष मधुकर साळवे,त्रिदल श्रीगोंदा तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण त्रिदल करमाळा शहराध्यक्ष रावसाहेब शिंदे त्रिदल पाटोदा तालुका अध्यक्ष रामराव तांबे, बीड शहराध्यक्ष अशोक जायभाये, त्रिदल अहिल्यानगर कार्याध्यक्ष,शरद कातोरे आष्टी तालुका अध्यक्ष नवनाथ भगत(महाराष्ट्र चॅम्पियन कुस्ती),सचिव हनुमान झगडे,सहसचिव बबन दहिफळे, कोषाध्यक्ष कैलास पाखरे,कडा अध्यक्ष गोरख काळे,डायरेक्टर मनीष नरोडे,गटप्रमुख विष्णू पवार, दादासाहेब ठोंबरे,दिलीप मराठे,संजय गायकवाड महबूब सय्यद,आदी मान्यवर उपस्थित होते.त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य “तिसरा वर्धापन” दिनाचे औचित्य साधून
लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य बीड जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब साबळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य “तिसरा वर्धापन” दिन सोहळा आष्टी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यानिमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष अंकुश जी खोटे साहेब त्याचप्रमाणे सर्व जिल्ह्यातून आलेले जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या