राजमाता जिजाऊ क्रिकेट अकॅडमीच्या नुमान शेख याची निवड
राजस्थानच्या कोटा येथे भारताच्या विद्यापीठ झोन क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
कडा प्रतिनिधी- सोपान पगारे
तालुक्यातील साबलखेड येथील नुमान शेख याची कोटा (राजस्थान) येथे होणाऱ्या विद्यापीठ झोन क्रिकेट स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली आहे
नुमान शेख याने कठोर सराव व अचूक कौशल्याने क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळवले आहे. त्याची ही निवड म्हणजे राजमाता जिजाऊ अकॅडमीच्या प्रशिक्षक शेख रहीम सर व त्याच्या मेहनतीचे फळ आहे. ही निवड राजमाता जिजाऊ क्रिकेट अकॅडमीमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शक्य झाली आहे. नुमान शेख याने आपल्या उत्कृष्ट बॉलिंग आणि अष्टपैलू खेळाने निवड समितीला प्रभावित केले. त्याच्या निवडीमुळे स्थानिक क्रिकेट समुदायात आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या या निवडीमुळे पुन्हा एकदा आष्टीचे नाव क्रिकेट मध्ये उज्वल केले आहे. नुमान शेख याने आष्टी, बीड, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अहील्यानगर, नाशिक व इतर अनेक ठिकाणी आपल्या अष्टपैलू खेळाचे बहारदार प्रदर्शन करून तसेच चौकार व षटकारांची आतिषबाजी करत क्रिकेटचे मैदाने गाजवले आहेत. आष्टी येथे ए पी एल क्रिकेट स्पर्धेत नुमान ला आपल्या संघात घेण्यासाठी अनेकांची ओढाताण सुरू असते. महागडा खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. नुमान शेख याला राजमाता जिजाऊ क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक शेख रहीम सर तसेच हंबर्डे महाविद्यालयाचे क्रीडा विभागाचे प्रा वनगुजरे सर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. नुमान शेख यांच्या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.