5.4 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

राजकीय डावपेचांनी भरल्या आहेत ‘या’ 5 वेब सीरिज; पाहिल्या नसतील तर लगेच पाहून घ्या

बॉलिवूडमध्ये राजकारणावर आधारित आजवर अनेक सिनेमे येऊन गेले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अनेक दर्जेदार कॉन्टेंट असलेल्या वेब सीरिज पाहायला मिळत आहेत. राजकीय मुद्दे, डावपेचांनी भरलेल्या या 5 वेब सीरिज तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की पाहा.

 

 पंकज त्रिपाठी, अली फजल सारखे दमदार कलाकार असलेली मिर्झापूर ही वेब सीरिज नक्की पाहा. क्राइम आणि राजकीय मुद्द्यावर ही कलाकृती तयार करण्यात आली आहे. मिर्झापूरचा पहिला सीझन सुपरहिट झाल्यानंतर आता प्रेक्षक दुसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत.

 बिहारच्या राजकारणाची झलक दाखवणारी महाराणी ही वेब सीरिज MX Player वर पाहायला मिळेल. बिहार मधील राजकीय परिस्थिती यात उत्तमरित्या दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अभिनेत्री हुमा कुरेशी यात राबडी देवीच्या भूमिकेत आहे.

 साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेत्री ते तमिळनाडूची मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित क्विन ही वेब सीरिज देखील पाहण्यासाखी आहे. MX Player वर ही वेब सीरिज पाहायला मिळेल.

 अभिनेत्री प्रिया बापट, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, सचिन पिळगावकर मराठीतील तगडी स्टारकास्ट असलेली सिटी ऑफ ड्रिम या वेब सीरिजला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील राजकारण दाखवण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे.

 अभिनेता सैफ अली खानच्या तांडव या वेब सीरिजची खूप चर्चा झाली होती. ही वेब सीरिज पॉलिटिकल एजेंटवर आधारित आहे.

 

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या