16.3 C
New York
Monday, September 16, 2024

Buy now

धनंजय मुंडे इतिहास आणि सध्याचे राजकारण: संघर्ष नेता ते लोकनेता

धनंजय मुंडे इतिहास आणि सध्याचे राजकारण: संघर्ष नेता ते लोकनेता

धनंजय पंडितराव मुंडे

(जन्म १५ जुलै १९७५) हे एक मराठी राजकारणी व सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

मुंडे यांचा जन्म १५ जुलै १९७५ला नाथ्रा, परळी वैजनाथ, बीड येथे वंजारी कुटुंबात झाला. मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल परळी वैजनाथ येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बॉयसीस कॉलेज पुणे येथून झाले आहे. त्यांनी बॅचलर ऑफ सोशल लॉ मधून आपली पदवी संपादन केली आहे.

राजकारण

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरुवातीला ते भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले.

पुरस्कार

  1. दैनिक लोकमतच्या वतीने विधिमंडळातील उत्कृष्ट अभ्यासू वक्ता पुरस्कार
  2. दैनिक लोकमतच्या वतीने पॉवरफुल राजकारणी पुरस्कार

नंजय मुंडे यांची राजकीय सुरुवात जिल्हा परिषद सदस्यपदापासून झाली. बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. भाजपमध्ये असताना भारतीय जनता युवा मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर त्यांची विधान परिषदेवर निवड झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद संभाळलेल्या धनंजय मुंडे यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर सरकारला मागच्या वेळी आपल्या आक्रमक भाषणांनी सळो की पळो केले.

परळी मतदार संघातून त्यांनी भाजप नेत्या व तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पक्षाने त्यांना राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या महत्वाच्या खात्यांच्या मंत्रीपदासह बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीद दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, परळी नगर परिषद, परळी बाजार समिती अशा विविध समस्थांवर सत्ता आहे. संत नागा जगमित्र सहकारी सुतगिरणीचे ते संस्थापक आहेत. त्यांनी साखर कारखान्याची उभारणीही सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा संघटनेवरही त्यांचेच वर्चस्व आहे.

तसेच त्यांना २०१९ नाशिक येथे सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने १७९ वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा “कार्यक्षम आमदार” पुरस्कार महाराष्ट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व राष्टवादीचे नेते धनंजय मुंडे यांना घोषित करण्यात आला. ५० हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते.

धनंजय मुंडेंचं परळीत ग्रँड वेलकम‘ !

शिंदे – फडणवीस सरकारमध्ये थेट सहभागी होत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याचवेळी त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. आता या आठही आमदारांचं त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. यात धनंजय मुंडे यांच्या स्वागताच्या बॅनरवर परळीत दिवंगत गोपीनाथ मुंडे,शरद पवार आणि पंकजा मुंडे यांचा फोटो वापरण्यात आला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तदनंतरच

कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुरुवारी धनंजय मुंडे  हे आपल्या परळी मतदारसंघात जात आहेत. त्यांची जाहीर सभा देखील आहे. मुंडे मतदारसंघात असतानाच परळीमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या फ्लेक्सवर गोपीनाथ मुंडे, पंडित आण्णा मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचेही फोटो झळकवले

सध्या राजकारण नवीन दिशेने सुरु आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत युती सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेत ९ जणांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आला. यामध्ये राज्याच्या दृष्टीने महत्वाचे खाते मानले जाणाऱ्या कृषी खाते अब्दुल सत्तार यांच्याकडून काढून घेत धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आले आहे.

याच जिल्ह्याचे धनंजय मुंडे यांना आता शेतकऱ्यांशी निगडित कृषी खाते मिळाल्याने त्यांना मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी काम करण्याची मोठी संधी धावून आली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यासाठी त्यांनी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचीही गरज आहे.

मागच्या कित्येक वर्षांपासून धनंजय मुंडे यांना राजकारणात सक्रीय असल्याने त्यांची प्रशासकीय यंत्रणेवर वचक निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना मिळालेल्या कृषी खात्याच्या माध्यमातून काम करत त्यांना मराठवाड्याचे नेते म्हणून ओळख निर्माण करण्याची मोठी संधी आहे.

कृषीमंत्री होताच धनंजय मुंडेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

शिंदे-फडणवीस सरकारमधील नव्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ आणि नियोजन खातं देण्यात आलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीला वैद्यकीय शिक्षण, सहकार, अर्थ, कृषी यांसारखी महत्त्वपूर्ण खाती मिळाली आहे. परळीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे मातब्बर नेते धनंजय मुंडे यांना कृषी खातं मिळालं आहे. मुंडे हे कृषीमंत्री होताच त्यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केलं आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये अपुरा पाऊस पडलेला असल्याने आज असलेला वाढदिवस साजरा करणार नसल्याचं धनंजय मुंडे यांनी ठरवलं आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी एक पत्रक जारी करत शेतकरी तसेच कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याच्या सूचना केल्या आहे.

जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा सदैव माझ्यासोबत

नवनिर्वाचित कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये जनतेचे प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छा सदैव माझ्यासोबत आहेत. परंतु पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी- बळीराजाच्या भावनांची जाणीव ठेवून यावर्षी मी वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा न करत करण्याचा निर्णय घेतला असल्याचे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे म्हटले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या