23 C
New York
Monday, May 27, 2024

Buy now

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित दबाव टाकला आणि,,,,,,,,बच्चू कडू

राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित दबाव टाकला आणि,,,,,,,,बच्चू कडू

मुंबई वृत्तसंस्था:


राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित दबाव टाकला आणि यशस्वी झाले, अशी प्रतिक्रिया आमदार कडू यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. खातेवाटपावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, “मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात उशिरा आलेल्या राष्ट्रवादीला झुकतं माप दिलं आहे, असं एकंदरीत दिसतंय. आता जे काही राहिलेले लोक आहेत, त्यांच्या नशिबी काय येईल? हे मला माहीत नाही. आता जे खातेवाटप झालंय, ते अजित पवार यांच्या सोयीनुसार झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने व्यवस्थित दबाब टाकला आणि ते यशस्वी झाले, असं एकंदरीत दिसतंय.”
अजित पवारांना अर्थ खातं देण्याबाबत विचारलं असता बच्चू कडू पुढे म्हणाले, “अजित पवारांना अर्थखाते मिळू नये, असं सर्वांचं मत होतं. कारण ज्यावेळी राज्यात राष्ट्रवादी,  काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता होती. तेव्हा अजित पवारांनी शिवसेनेच्या आमदारांना २५ लाख तर राष्ट्रवादीच्या आमदारांना ९० लाखांचा निधी देण्यात येत होता. पण, आता  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते अजित पवारांवर नजर ठेवतील, असं वाटतंय.”

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या