परळीचे टमाटे थेट सुनील शेट्टीच्या अंगावर,,,,,,, संतोष मुंडे यांचा अनोख आंदोलन
परळीतील कोणत्याही प्रश्नी सामाजिक अनोख्या पद्धतीने आंदोलन करणारे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखले जाते असे डॉक्टर संतोष मुंडे यांनी सुनील शेट्टीच्या वाचाळ वाक्यांना आपल्या अनोख्या आंदोलनातून उत्तर दिलं आहे.
कधी न्हवे तो शेतकऱ्याच्या शेतीच्या मालाला भाव येतो आणि या रंगेल दुनियाच्या काही व्यक्तींना त्याचा त्रास होऊ लागतो असेच चित्र सध्या पहायला मिळत आहे.
एकीकडे बर्गर बनवणारे म्हणतात की, आम्ही टमाट्याचा वापर कमी करू आणि दुसरीकडे रंगेल दुनियाचे काही नाचे म्हणतात, अशा समस्यांचा आम्हाला सामना करावा लागत आहे.जेव्हा स्वतःचा नाट्ययुक्त सिनेमा सुपरहिट होतो. त्यावेळी त्याची मोज मजा करणारे काही नाचे, आज शेतकरी त्याच्या मालाला भाव मिळत आहे तर त्याला मिळणारा कधी न्हवे तो थोडाफार आनंद देण्याऐवजी तो हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
वर्षानुवर्ष बर्गर पिझ्झा खाऊन ज्यांच्या संपत्ती मध्ये वाढ होते ते व्यक्ती आज टमाट्याचा भाव वाढला तर असं म्हणतात की आम्ही टमाट्याचे प्रमाण कमी करू यावरून गरीब हा श्रीमंतच असतो आणि श्रीमंत हा लाचार असतो हे दिसून येते, शेतकरी राजा वर्षांवर्षी केलेले कष्ट त्याच्या हातामध्ये दामीपर्यंत त्याच्या कामाचा मोल मिळत नाही एकीकडून नैसर्गिक संकट काही वेळा भांडवलदारामार्फत केलेले संकट दुसरी कडून त्यांच्या मालाला मिळणारा बाजार भाव यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांनी स्वतःच्या टमाट्यावर ट्रॅक्टर फिरवलेले आपण पाहिला आहे आणि त्याच शेतकऱ्यांच्या त्याच मालाला जर आज बाजारामध्ये थोडाफार भाव मिळत असेल तो अनेक वर्ष काम करून काही दिवस त्याचे आनंदा जात असतील तर अशा नाच्यांना पाहवत नसेल तर हे भारताचे दुर्दैवच म्हणावं लागेल,
यावरून एकच म्हणता येईल की जे टमाटे खाऊन शारीरिक फायदा आपण घेत असतो हेच टमाटे जर भाव वाढला तर आपण त्यांचा वापर कमी करावा अशी श्रीमंत लोक म्हणत आहेत.
अशा वाचाळ वीरांना एकच उत्तर आहे शेतकऱ्यांचे टोमॅटो त्यांच्या थोबाडावर मारले पाहिजेत.
सुनील शेट्टी काय म्हणाला, “टोमॅटोच्या वाढत्या किंमतीचा परिणाम माझ्या स्वयंपाकघरावरही होऊ लागला आहे. आम्ही ताजे उगवलेले अन्न खाण्यावर विश्वास ठेवतो. टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत आणि त्याचा परिणाम आमच्या स्वयंपाकघरावरही झाला आहे. आजकाल मी टोमॅटो कमीच खातो. लोकांना वाटेल की मी सुपरस्टार असल्याने या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण हे खोटे आहे, आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते.”