- परळीच्या विद्यार्थ्यांची जेईईत उत्तुंग झेप:आयआयटीत मिळवला प्रवेश; सौ.राजश्री धनंजय मुंडे यांच्याकडून कौतुक
- परळी वैजनाथ, प्रतिनिधी….
देशपातळीवरील कठिण समजल्या जाणाऱ्या जेईईत मेन्स व जेईईत ॲडव्हान्स अशा परीक्षेत उत्तुंग यश मिळवून इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये चि.ॠषभ राजेंद्र लोढा या परळीच्या विद्यार्थ्याने प्रवेश मिळवला आहे. परळीसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असुन त्याचे या यशाबद्दल
सौ.राजश्री धनंजय मुंडे यांच्याकडून कौतुक केले आहे.
परळीचा चि.ॠषभ राजेंद्र लोढा याने जेईईत मेन्स व जेईईत ॲडव्हान्स या देशातील अतिशय कठीण अशा परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.त्याचा आय.आय.टी. (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) मध्ये प्रवेश निश्चित झाला आहे.परळीकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. या उत्तुंग यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.चि.ॠषभ राजेंद्र लोढा याचे राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांची स्वाक्षरी असलेले मानपत्र सौ.राजश्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते देवून गौरव करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, पालक डॉ.राजेंद्र लोढा व परिवार उपस्थित होते.