5.4 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिला वृक्ष संगोपनाचा संदेश!

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिला वृक्ष संगोपनाचा संदेश!

लिटल फ्लावर स्कूलच्या चिमुकल्यांनी वेधले परळीकरांचे लक्ष!!

परळी वैजनाथ प्रतिनिधी
परळीतील नामांकित इंग्लिश मीडियम लिटल फ्लावर स्कूलमध्ये वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे वृक्षदिंडीत सहभाग नोंदवत वृक्ष संगोपनाचा संदेश देत परळीकरांचे लक्ष वेधले.

वृक्षदिंडी चे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली लिटल फ्लॉवर येथून इंडस्ट्रियल एरिया, वडर कॉलनी ,स्नेहनगर , फाउंडेशन स्कूल रोड ते नेहरू चौक (तळ) येथून शाळेमध्ये येऊन समारोप करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून शहरातील नागरिकांनी रॅलीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा, एक मुल एक झाड, सेव ट्री सेव अर्थ अशा विविध घोषणा देऊन वृक्ष संगोपन करण्यासंबंधी रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. कार्यक्रम समारोप प्रसंगी बशीर सर यांनी वृक्षरोपणाचे विद्यार्थ्यांना महत्त्व विशद केले.

यावेळी अडमिनिस्ट्रेटर बशीर सर,प्रिन्सिपॉल सौ.नमिता रॉय, मुख्याध्यापक श्री रमेश बेंडसुरे
या कार्यक्रमास, श्री हत्ते, रोडे, डि.बी गोरे,श्री मुंडे,काजगुंडे सर, शेख निदा, राधिका लोखंडे ,पवार टिचर उपस्थित होते

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या