23.3 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

बुद्धीवादी माणस व्यक्तच होत नाहीत ही आजच्या भारताची प्रमुख समस्या :- डॉ राजेश इंगोले ‘भारत माझा देश आहे’ वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न.

बुद्धीवादी माणस व्यक्तच होत नाहीत ही आजच्या भारताची प्रमुख समस्या :- डॉ राजेश इंगोले
‘भारत माझा देश आहे’ वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न.
————————————–
अंबाजोगाई, प्रतिनिधी:-
आज भारत देश एका मोठ्या भीषण सामाजीक अस्थिरतेच्या परिस्थितीतून जात आहे, कधी नाही एव्हढा जातीवाद, धर्मवाद वाढून माणसा माणसात संशयाच बीज पेरल्याच दिसत आहे. देश जातीच्या धर्मच्या आधारे उभ्या फुटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याने समाज माध्यमे, विचारवंत, बुद्धिवंत,सारस्वत वर्ग मुका झाल्याचे चित्र दिसत आहे आणि बुद्धिवंताचे या परिस्थितीत व्यक्त न होणे ही या देशाची मोठी समस्या असल्याचे मत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ तथा इंडीयन मेडीकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य सांस्कृतीक सचीव डॉ राजेश इंगोले यांनी व्यक्त केले.
मेडीकल असोसिएशन,पाटोदा यांच्या वतीने “भारत माझा देश आहे” या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना ते आपले मत व्यक्त करत होते.
यावेळी व्यासपीठावर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अपूर्व शिंदे ,प्रमुख पाहुणे डॉ प्राजक्ता जाधव, डॉ पंचशील गडसिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ1 इंगोले यांनी महासत्ता ,महागुरू बनविण्याचे स्वप्न दाखवत सर्वसामान्य जनतेला विकासाची स्वप्ने दाखवीत स्वतःचे राजकीय ध्येय गाठण्यासाठी जातीवादी प्रवृत्ती कडून जाणीवपूर्वक व्यक्तिद्वेष, जातिद्वेष, धर्मद्वेष वाढविण्याचे असुरी प्रयत्न सुरू आहेत. तत्वांना तिलांजली देत व्यक्तिगत स्वार्थासाठी सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीला समाजमन उबगलेलं आहे याची प्रचीती येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता दाखवील का नाही हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. सामाजीक क्रांती घडवून आणण्यासाठी, वैचारीक बदल घडवून आणण्यासाठी समाजातील बुद्धिवंतांनी कमीतकमी आपली भूमिका मांडणे गरजेचे आहे अन्यथा समाज संभ्रमात राहून दिशाहीन होईल आणि नेमके हेच सध्या कुटनीती समजावून सांगणाऱ्या धूर्त लोकांना साध्य करायचे आहे.
त्यामुळे येणारा काळ अत्यंत धोकादायक असून जर विचारवंत,बुद्धिवंत आपली मते, विचार, समाजप्रबोधन करणार नसतील तर येणारी पिढी यांना माफ करणार नाही असे सडेतोड वक्तव्य डॉ राजेश इंगोले यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ हेमंत देशमुख यांनी करतांना देश संक्रमण अवस्थेतून जात असून समाजमन निराश झालेले आहे. तत्वच्युत राजकारणामुळे सामान्य माणसाला राजकारणाचा तिटकारा आलेला आहे त्यामुळे राजकारण हे आपला प्रांत नाही म्हणत सामान्य लोक, बुद्धिवंत राजकारणापासून दूर जात आहेत हे देशाला अत्यंत धोक्याचे असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ माधुरी शिंदे तर आभार प्रदर्शन डॉ रतन पाचपिंडे यांनी केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयीन युवकांनी आपली उपस्थिती लावली. यावेळी संयोजकांकडून घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे डॉ राजेश इंगोले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या