25.4 C
New York
Friday, April 25, 2025

Buy now

चिराग पासवान NDA च्या दिशेने मुंबई: वृत्तसंस्था

चिराग पासवान NDA च्या दिशेने
मुंबई: वृत्तसंस्था
लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सामील झाले आहेत. तशी अधिकृत घोषण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी १७ जुलै रोजी केली. १८ जुलै रोजी एनडीएची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार आहे. असे असताना एक दिवस अगोदर म्हणजेच १७ जुलै रोजी चिराग पासवान यांनी एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

एनडीएमध्ये सामील होण्याआधी चिराग पासवान यांनी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान लोक जनशक्ती पार्टी (रामविलास ) पक्षाला लोकसभा निवडणुकीत किती जागा देण्यात येणार? बिहारच्या विधानसभा निवडणुकीत किती जागा मिळणार? अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली होती. २०१९ साली लोक जनशक्ती पार्टीमध्ये दोन गट पडलेले नव्हते. तेव्हा चिराग पासवान यांचे वडील रामविलास पासवान यांना भाजपाने लोकसभेच्या सहा जागा दिल्या होत्या. तसेच त्यांना राज्यसभेचीही जागा देण्यात आली होती.
२०२० साली बिहारमधील नितीश कुमार यांच्या जदयू पक्षाने भाजपासोबत युती केली होती. त्यामुळे चिराग पासवान यांनी एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पुढे २०२२ साली नितीश कुमार यांनी एनडीएमधून पडले. याच कारणामुळे बिहारमध्ये फायदा व्हावा यासाठी भाजपा पक्ष चिराग पासवान यांना एनडीएमध्ये सामील करण्यास उत्सुक होता.

चिराग पासवान यांनी एनडीएमध्ये सामील होताना मला लोकसभेची हाजीपूर जागा द्यावी, अशी मागणी केली आहे. रामविलास पासवान या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. हा मतदारसंघ चिराग पासवान यांच्यासाठी सुरक्षित समजला जातो. मात्र सध्या या जागेवरून पारस लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या