19.7 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

सुनील शेट्टीची यांना बसला डॉ संतोष मुंडे यांच्या अनोख्या आंदोलनाचा फटका आणी मागितली शेतकऱ्यांची माफी

सुनील शेट्टीची यांनी घेतला डॉ संतोष मुंडे यांच्या अनोख्या आंदोलनाचा धसका आणी मागितली शेतकऱ्यांची माफी

मुंबई- वृत्तसंस्था

बॉलिवूडचे अण्णा म्हणजेच सुनील शेट्टीची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा होत आहे, काही दिवसांपूर्वीच सूनीलने टोमॅटो आणि त्यांच्या वाढत्या किमतीवर विधान केले होते. सुनील शेट्टीने नुकतेच टोमॅटोबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. जेव्हा अभिनेत्याने टोमॅटोच्या वाढत्या किंमतीवर आपले मत व्यक्त केले तेव्हा सोशल मीडियावर त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. याच कारणामुळे सुनील शेट्टीला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता ट्रोलिंगला कंटाळलेल्या अभिनेत्याने आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.
टोमॅटोच्या वाढलेल्या किंमतीवर आपले मत व्यक्त करताना सुनील शेट्टी म्हणाला होता की, या गोष्टीचा परिणाम त्याच्या स्वयंपाकघरावरही होत आहे. सुनील शेट्टीने त्याच्या आधीच्या विधानात म्हटले होते की त्याने अलीकडे टोमॅटोचा वापर कमी केला आहे. यानंतर त्याच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुंदर मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळीमध्ये अनोखा आंदोलन केलं होतं यावेळी त्यांनी सदरील टोमॅटोच्या पेट्या सुनील शेट्टी यांना पाठवल्या होत्या,
यावेळी डॉक्टर संतोष मुंडे यांनी सुनील शेट्टी यांच्यावर सरकून टीका केली होती ते असं म्हणाले होते की,
शेतकरीद्रोही हजारो कोटींचा मालक सुनील शेट्टीसारख्या वाचाळवीर लोकांना चाप लागावा म्हणून सरकारने कायदा करावा अशी मागणी केली . याबाबत लवकरच राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांना भेटणार असे सांगितले होते.

या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे शहराध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष बाजीरावभैया धर्माधिकारी यांनी असं म्हटलं होतं की,  मैकडॉनल्ड्स सारख्या कंपन्या शेकडो रुपयांना एक बर्गर विकतात. टोमॅटोचे भाव वाढले म्हणून टोमॅटो खरेदी बंद करणारे भांडवलदार टोमॅटो किंवा इतर कोणत्या भाजीपाल्याचे भाव कमी झाल्यावर त्यांच्या उत्पादनांचे भाव कमी करत नाहीत. त्यामुळे सुनील शेट्टी सारख्या सरंजामीवृत्तीच्या लोकांना वेसण घातलीच गेली पाहिजे असे प्रतिपादन रा.काँ. चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी व्यक्त केल्या होत्या. या सर्व आंदोलनानंतर सोशल मीडिया वरती सुनील शेट्टी हे ट्रोल होत होते, या सर्व गोष्टींचा परिणाम पाहता सुनील शेट्टीने शेतकऱ्यांची माफी मागितली आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या