16.3 C
New York
Monday, September 16, 2024

Buy now

‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, ऑरेंज अलर्टनंतर आयुक्तांचं मुंबईकरांना आवाहन

गरज असेल तरच घराबाहेर पडा‘, ऑरेंज अलर्टनंतर आयुक्तांचं मुंबईकरांना आवाहन 

मुंबई: वृत्तसंस्था  20 जुलै :

बुधवारी रात्रीपासून कोसळत असलेला पाऊस गुरूवारीही कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केलं आहे. 20 जुलैला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचा जोर बघता मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

‘मुंबईमध्ये जोरात पाऊस असून अतिवृष्टी होऊनसुद्धा कुठेही पाणी साचलं नाही. ही समाधानकारक बाब आहे. सकाळपासून सर्व वॉर्ड ऑफिसर आणि संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरली आहे. जिथे पाणी साचतं तिकडे जाऊन यंत्रणा ते क्लिअर करत आहे. गुरूवारीही मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट आहे, अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्यामुळे सगळ्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. अत्यंत महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नये, जेणेकरून त्यांची गैरसोय होऊ नये. गुरूवारीही आपली संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर असून लोकांची गैरसोय कशी कमी करता येईल, यावर आमचं लक्ष राहील,’ असं इक्बालसिंग चहल म्हणाले आहेत.

 

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या