14.5 C
New York
Thursday, May 30, 2024

Buy now

spot_img

अप्पर तहसील निर्मितीचा कासार शिरशीत जनतेकडून जल्लोष

अप्पर तहसील निर्मितीचा कासार शिरशीत जनतेकडून जल्लोष

प्रतिनिधी : चंद्रशेखर केंगार

महाराष्ट्र सरकारच्या महायुती आघाडी सरकारने
नुकतेच कासार शिरसी येथे महसुली विभागाच्या तालुकास्तरीय अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्मितीची घोषणा केल्याने कासार शिरसीसह या चारही महसूल विभागातील जनतेच्या वतीने येथील शिवाजी चौकात फटाक्यांची अतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी पक्ष कार्यकर्त्यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नागरिकांनी आनंद व्यक्त केला याप्रसंगी मोठा जनसमुदाय जमला होता
बऱ्याच वर्षापासून कासार सिरसी ला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती पण आतापर्यंत कोणीच या भागातील जनतेच्या भावनेची दखल घेतली नाही औसा चे आमदार अभिमन्यू पवार यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी कासार शिरशीला तालुक्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते अनेक राजकीय अडचणींचा सामना करत सतत कार्यरत राहून त्यांनी सध्याच्या महायुती सरकारकडून अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून घेतले यापूर्वी बांधकाम विभागासह वीज वितरण महामंडळाचे तालुकास्तरीय कार्यालय येथे मंजूर झाले असून तालुका निर्मितीचा मोठा टप्पा पूर्ण करत या आमदाराने परिसरात विकासाचा सूर्य
जमिनीवर खेचून आनंत स्वतःच्या कर्तुत्वाचा ठसा जनमानसांच्या हृदयात उंमटावला त्या प्रित्यर्थ महाराष्ट्र सरकार व आमदार यांचे येथील जनतेतून अभिनंदन करण्यात आले याप्रसंगी मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वरजी वाकडे .अल्पसंख्याक अध्यक्ष जिलानी बागवान. संघटक सरचिटणीस धनराज होळकुंदे गोरख होळकुंदे .परमेश्वर बिराजदार .परमेश्वर.धुमाळ. बालाजी बिराजदार .हैदर मुत्रे .बाबू तांबोळी .आणिश बागवान .लाला मिया शेख. नितीन पाटील . शहाजी धुमाळ. नितीन पटवारी. राहुल ईश्वरे. अमोल इंगळे. आदी कार्यकर्ते हजर होते

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या