पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (फेरीवाला- pmswaidhi ) योजनेकरीता लाभार्थी यांनी कर्ज अर्ज करावेत : परळी नगरपरिषद
परळी : प्रतिनिधी
उपरोक्त वरील विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते कि नगर परिषद परळी अंतर्गत डेऐनयुऐलएम विभागा कडून शहरातील रस्त्यावर छोटे व्यवसाय करणारे एका जागी बसून किवा शहरात फिरून व्यवसाय करतात या लाभार्थी यांनी पुढील 7 दिवसात अर्ज करण्याचे आव्हाहन मा मुख्याधिकारी यांनी केले आहे .
सदरील लाभार्थी यांना शासनाच्या वतीने बँक मधून 10,000/- 20,000 /- 50,000 /- या प्रमाणात कर्ज मिळणार आहे .तरी लाभार्थी यांनी आपल्या जवळील आधार कार्ड ,पेन कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक, व्यवसायचा फोटो, असे कागदपत्र घेवून कार्यालयात येवून विभागा मधून माहिती घ्यावी व शिफारस अर्ज घ्यावे. तरी सदरील योजनेचा अर्ज करण्यास सोपे होईल.
करीता सदरील अर्ज on line पोर्टरल वर भरण्यास पहावे लिंक –pmswanidhi या साईट वर शिफारस अर्ज जोडून फोर्म भरण्यात यावे व अर्ज कार्यालयात सादर करावे असे मा मुख्याधिकारी यांनी कळविले आहे .