19 C
New York
Wednesday, September 18, 2024

Buy now

“…मग हे कसलं प्रशासन?” राज ठाकरे

“…मग हे कसलं प्रशासन?” राज ठाकरे

राज ठाकरे ट्वीटमध्ये म्हणाले, “रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे, असं सांगण्यात येत आहे. यातून लोक सुखरूप बाहेर पडावीत, इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं.”
दुर्घटनेनंतर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रायगड दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याच्या घटनेबद्दल राज ठाकरेंनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच दुर्घटनाग्रस्त लोकांना आणि नातेवाईकांना महाराष्ट्र सैनिकांनी मदत करावी, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं. त्याचबरोबर प्रशासनाच्या कारभारावरही राज ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

चौकट : राज ठाकरे
“खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती. पण आता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात? ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे यावर सविस्तर बोलेन पण आतातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा.”

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या