- माणुसकी जपणारा मुख्यमंत्री: एकनाथ शिंदे पायी दीड तास पायी चालत जाऊन ते इर्शाळगडावर पोहोचले
रायगड : वृत्तसंस्था
रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुसळधार पावसामुळे इर्शाळगडावरील दरड इर्शाळवाडीवर कोसळली. दरडप्रवण क्षेत्राच्या बाहेर असलेल्या या भागात दरड कोसळल्याने गावातील लोक भयभीत झाले आहेत. आतापर्यंत १०३ लोकांना या भागातून बाहेर काढण्यात आलं आहे. यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी येथे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे तिथून गाडी जाणे अशक्य आहे. ही घटना समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्काळ खालापूरला दाखल झाले. तेव्हापासून ते परिस्थितीचा आढावा घेत होते. अशा परिस्थितीत घटनास्थळी जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायी चालत निघाले. दीड तास पायी चालत जाऊन ते इर्शाळगडावर पोहोचले.
पाऊस असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडीवर पायी चालत गेले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.