24.7 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

भारत सरकारच्या नावाने अनेकांच्या मोबाईलवर ‘अलर्ट’, नागरिक संभ्रमात

भारत सरकारच्या नावाने अनेकांच्या मोबाईलवर ‘अलर्ट’, नागरिक संभ्रमात

वृत्तसंस्था :
आज सकाळपासून अनेक जणांच्या मोबाईलवर एक सिक्युरिटी अलर्ट येत आहे. हा प्रकार नक्की काय? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास अनेक मोबाईलधारकांचा मोबाईल अचानक मोठ्या आवाजात वाजायला लागला. यानंतर मोबाईलच्या स्क्रिनवर एक संदेश आला. त्यात हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपतकालीन संदेश सेवेचा भाग असल्याचे सांगण्यात आले. काही सेकंद मोठ्या आवाजात अलार्म वाजल्यानंतर तोच मेसेज व्हॉईस मेल स्वरुपात ऐकू आला.

आपतकालीन संदेशातील ओके बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला असे आपतकालीन अलर्ट हवे आहेत का असं विचारण्यात आलं. तसेच हो आणि नाही असे दोन पर्याय देण्यात आले. आधी हा अलर्ट इंग्रजीत आला आणि त्यानंतर मराठीत आला.
विशेष म्हणजे सर्व अँड्रॉईड मोबाईलवर हा संदेश आला असला, तरी अॅपल आयफोनवर असा कोणताही अलर्ट आलेला नाही.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या