16.2 C
New York
Wednesday, May 29, 2024

Buy now

spot_img

इर्शाळवाडीची घटना ही सह्याद्रीवर मानवी आघातांचा हा दुष्परिणाम आहे”, पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचं मत

“इर्शाळवाडीची घटना ही सह्याद्रीवर मानवी आघातांचा हा दुष्परिणाम आहे”, पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचं मत

मुंबई वृत्तसंस्था :

महाराष्ट्रात आजची सकाळ उगवली ती एका दुर्दैवी बातमीने. इर्शाळगडाच्या जवळ असलेल्या इर्शाळवाडी गावात दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत सुन्न करणारी आणि मन हेलावून टाकणारी आहे. आत्तापर्यंत १०३ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मदत आणि बचाव कार्यात अनेक अडथळेही येत आहेत. कारण डोंगर उतारावर इर्शाळवाडी हे गाव आहे. गावातील १०० ते १५० लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज सुरुवातीला बचाव पथक आणि पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यापैकी १०३ लोकांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अजूनही काही लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बचावकार्य सुरूच राहील, असंही त्यांनी सांगितलं.

चौकट : एकनाथ शिंदे
हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यासाठी सज्ज आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची माहिती घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

चौकट : माधव गाडगीळ
अयोग्य रितीने डोंगर पोखरुन काढले जात आहेत. सह्यांद्रीवर आपण जे मानवी आघात करतो आहोत त्या आघातांचा हा दुष्परिणाम आहे असं माधव गाडगीळ यांनी म्हटलं आहे. आमच्या सारख्या लोकांनी जो अहवाल सादर केला तो राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणेल असा दावा करण्याचा आचरटपणाही केला गेला आहे. त्यानंतर आज तुम्ही जाऊन बघा काहीही कारण नसताना तो अहवाल केंद्रीय पर्यावरण खात्याने तो अहवाल आपल्या वेबसाईटवरुन काढून टाकला आहे

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या