3.2 C
New York
Sunday, January 19, 2025

Buy now

मुंबई येथील आश्रम मध्ये रुग्ण मित्र फांऊडेशन व जनशक्ती संघटना तसेच नेचर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर संपन्न.

मुंबई येथील आश्रम मध्ये रुग्ण मित्र फांऊडेशन व जनशक्ती संघटना तसेच नेचर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर संपन्न.

 

नवी मुंबई प्रतिनिधी
..
आज दिनांक 23 जुलै 2023 वार रविवार जनशक्ती शेतकरी संघटना रुग्ण मित्र फाउंडेशन फाउंडेशन व केअर नेचर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज चिरनेर येथे आश्रम शाळेवर मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला यामध्ये प्रामुख्याने मुलींचे हे प्रमाण भरपूर होते या शिबिराच्या दरम्यान आपण मुलींना सॅनिटरी पॅड चे वाटप केले आणि पूर्ण आरोग्याची तपासणी करून त्यांना मोफत औषध देण्यात आले… या शिबिरामध्ये प्रामुख्याने डॉक्टर म्हणून डॉक्टर दिपाली गोडघाटे मॅडम यांची उपस्थिती लाभली तसेच डॉक्टर देसाई यांनीही आपला सहभाग दिलेला आहे दीपेश फाउंडेशनच्या गोडघाटे मॅडम व त्यांच्या संपूर्ण टीमने या कार्यक्रमाला सहकार्य दिले तसेच केअर ऑफ नेचर चे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही या कार्यक्रमाला सहकार्य लाभले या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुजन वर्ग यांचेही सहकार्य लाभले .. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजन चे नियोजन रुग्णू मित्र फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय रोहित धुरंधरे साहेब यांचे शाब्दिक सहकार्य लाभले. आणि त्यांनी सर्व शिबीरासाठी आम्हाला मेडिसिन ची व्यवस्था उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे आभार यापुढेही रुग्ण मित्र फांऊडेशन जनशक्ती संघटना यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मोफत महाआरोग्य शिबीर राबवले जाणार आहेत.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या