19 C
New York
Tuesday, May 28, 2024

Buy now

spot_img

बीड शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर IPS पंकज कुमावत यांच्या पथकाची कारवाई

◼️बीड शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर IPS पंकज कुमावत यांच्या पथकाची कारवाई

◼️डमी कस्टमर पाठवून खात्री पटल्यानंतर श्वेता खाडे यांची धाड

◼️तीन पिडीतांची सुटका , उशिरापर्यंत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु

बीड अतुल्य महाराष्ट्र वृत्तांकन | शहरातील जालना रोड परिसरात गेल्या अनेक दिवसापासून स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता, याची माहिती थेट आयपीएस पंकज कुमावत यांना मिळाल्यानंतर त्यांनी माजलगावच्या पोलीस उपाधीक्षक श्वेता खाडे यांना सदरील ठिकाणी पाठवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या . त्या अनुषंगाने श्वेता खाडे यांच्या टीमने ठिकाणी सदरील ठिकाणी एक डमी ग्राहक पाठवत खाञी पटल्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात तीन पिडीतांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून हि कारवाई आज रात्री उशिरा करण्यात आली.

बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जालना रोडवर मोठ्या चौकातील एका शोरुमच्या जवळ जालणा रोडवर एका इमारतीतमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यानंतर कुमावत यांनी माजलगावच्या पोलिस उपअधिक्षक स्वेता खाडे यांना आपल्या पथकासह धाड टाकण्यासाठी पाठवले. खाडे यांच्या टीमने डमी ग्राहक पाठवून खात्री केली. यानंतर धाड टाकली असता तीन पिडीतांची सुटका करण्यात आली. एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

 

 

 

 

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या