डॉ बाबासाहेब आंबेडकर ऑटो यूनियन रेलवे स्टेशन परळीच्या अध्यक्षपदी बाबा शेख, उपाध्यक्ष गायकवाड, सचिवपदी व्हावळे यांची निवड
सपोनि प्रवीण जाधव यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
परळी प्रतिनिधी
डॉ बाबासाहेब आंबेडकर ऑटो यूनियन, रेलवे स्टेशन परळीच्या अध्यक्षपदी बाबा शेख, उपाध्यक्ष वि. एस. गायकवाड, सचिवपदी सुनील व्हावळे तर कोषाध्यक्ष तिरुपती व्हावळे यांची निवड करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत संभाजी नगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान साकसमुद्रे हे होते. सदरील निवडीची बैठक दि २३ जुलै रोजी रेल्वे स्टेशन डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क परळी येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. यावेळी प्रा दासू वाघमारे, पोलीस अंमलदार एम एम घुगे हे हि होते. परळी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात ऑटो यूनियन नसल्याने अनेक समस्या उद्भवत होत्या.परंतु आता रेल्वे ऑटो यूनियन चे पदाधिकारी, संभाजी नगर पोलीस स्टेशन परळी आणि रेल्वे प्रशासन यांच्यात समन्वय होऊन प्रवाश्यांच्या अनेक समस्या सुटणार आहेत. यापूर्वीच रेल्वे प्रशासनाने ऑटो पॉईंट दिलेला आहे. सदरील रेल्वे ऑटो यूनियन ची माहिती रेल्वे प्रशासनाकडे पाठवली आहे . या बैठकीस ऑटो चालक आयुब पठाण, विकी मुंडे, प्रसाद कराड, ज्ञानोबा चाटे, शेख रज्जाक, रोहन बरडे, अरुण ढेंगे, यशपाल निकाळजे, गणेश भोसले, प्रदीप पाथरकर, सनी वाघमारे, सुरज बचाटे, अनिल सरवदे, कोयलाभाई, सतीश जुनाळ, धनंजय कुलकर्णी सह आदी ऑटो यूनियनचे पधादिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनील गायकवाड यांनी मानले.