लसूण महागला भाववाढीमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री
भाजीत सर्रास वापरला जाणारा लसूण आता महाग झाला आहे. यामुळे ग्राहक हात आखडून लसणाची खरेदी करत आहेत.नाशिक: भाजीत सर्रास वापरला जाणारा लसूण आता महाग झाला आहे. यामुळे ग्राहक हात आखडून लसणाची खरेदी करत आहेत. अवकाळी पावसाने नुकसान झाल्यामुळे लसणाची आवक घटली आहे.
लसणाची भाववाढ झाल्याने सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडल आहे. 200 ते 320 रुपयांपर्यंत किलोच्या दराने लसणाची विक्री होत असल्याने, लसूण खरेदी करण्यासाठी ग्राहकांची देखील घट झाली आहे. ही भाव वाढ साधारणतः चार ते पाच महिने अशीच राहील, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.