14.7 C
New York
Thursday, May 30, 2024

Buy now

spot_img

मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्याचे कार्य करावे- बाबुराव पोटभरे

मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्याचे कार्य करावे- बाबुराव पोटभरे

परळी / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि चळवळ पुढे नेण्याचे कार्य करावे असे आवाहन बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केले. ते संघटनेच्या वतीने परळी येथील वीज निर्मिती केंद्राच्या विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांशी बोलत होते.

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन औष्णिक विद्युत केंद्र परळी वै च्या वतीने बाबुराव पोटभरे यांचे स्वागत संघटनेच्या वतीने व्ही. आय. पी. रेस्ट हाऊस येथे दि २५ जुलै रोजी आयोजित बैठकीत करण्यात आले.या प्रसंगी बोलतांना बाबुराव पोटभरे म्हणाले की , बाबासाहेबांची चळवळ ही त्याग, बलिदान, आणि समर्पण या त्रिसूत्री वर आधारित आहे. फुले,शाहू,आंबेडकरी विचाराने प्रेरित सर्व कामगारांचे प्रश्न व समस्या सोडविण्याऱ्या महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे त्यांनी कौतुक केले. व म्हणाले की संघटनेतील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव संघटनेच्या पाठीशी राहील.
संघटनेचे नवनिर्वाचित पदाधिकारी तसेच सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल अविनाश वाले यांचा त्याच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास डॉ राजेश गट्टूवार, जगन्नाथ अनमोड,रजा खान, आकाश वाघ,अशोक व्हावळे,अशोक जावळे,अनंत रोडे,राहुलकुमार वाकळे,पुंजाराम इंगळे, वाजिद शेख, आबासाहेब गायकवाड, संघरक्षित मस्के,शरद लांडगे, धम्मपाल जगतकर, बंडू लांडगे, अरुणाचरण रोडे, स्वप्निल साळवे, शुभम साळवे इ. उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सल्लागार महेंद्र शिंदे, प्रस्तावना अविनाश वाले तर आभार प्रदर्शन जयवर्धन सूर्यवंशी यांनी केले.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या