24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img

एम.आय एम.च्या उपोषणास यश; मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

*एमआयएमच्या उपोषणास यश;
मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी..
नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी एमआयएम पक्षाच्या वतीने परळी नगर परिषदे समोर
दि. 27/07/2023 गुरूवार पासून आमरण उपोषण सुरू होते. मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

बरकत नगर,पेठ मोहल्ला, मलीकपूरा, आयशा काॅलनी,पालखी रोड, भीमनगर, सर्वे नंबर 75 मोमीनपूरा या भागातील विविध रोड, नाली,स्वच्छता,असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.कुरेशी नगर येथील शादीखान्याचे काम अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. वेळोवेळी नगरपरिषदेला निवेदन करून सुध्दा शहरातील विकास कामे होत नाहीत.शासनाचे करोडो रूपये निधी येऊन कामे होत नाही याचा परळीतील नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

परळी न प चे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांच्या लेखी आश्वासनानंतर तसेच काही कामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. शहरातील विविध विकस कामाला वाचा फोडण्यासाठी वंचितचे शहराध्यक्ष गफ्फार शहा, महासचिव मिलिंद घाडगे,गौतम आगळे तसेच उपोषणास एम.आय.एम ता.अध्यक्ष शेख शरीफ भाई, शहराध्यक्ष कादर कुरेशी, युवानेते शेख मोहसीन, युवक शहराध्यक्ष शेख अनवर,कार्याध्यक्ष फेरोज खान, माजी नगरसेवक ताज खान पठाण, शेख मुस्तफा भाई, युवानेते सलीम कुरेशी, शेख आबेद भाई, असरार खान, कोर कमिटी सदस्य नुर भाई, नाजेर शेख, शेख जुबेर, एजास खान, सय्यद सद्दाम, अश्फाक कुरेशी, शेख जुबेर, शेख लूखमान,शहेबाज़ कुरेशी,अफरोज़ पठाण,शेख रहीम, शेख मुबारक,युनूस साथी, शेख इन्ज़ेमाम, अनेक जण या उपोषणास उपस्थित होते.

spot_img
spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या