शरीराची निगा राखण्यासाठी दातेचे महत्व मोठे आहे :- डॉ. संकल्प वायाळ यांचे प्रतिपादन….
वाशीम दि.२७: (अजय ढवळे )
मनुष्याचा आहार, मनुष्याची पचनक्रिया, मनुष्याची भाषा, शब्दोच्चार या गोष्टीसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दातच कारणीभूत ठरतात म्हणूनच शरीराची निगा राखण्यासाठी दातांचे महत्त्व मोठं आहे. असे प्रतिपादन दंत चिकिस्तक डॉ.संकल्प वायाळ यांनी केले. दात आणि दातांची घावयाची काळजी अश्या महत्वाच्या विषयी तें एक चर्चा संत्रात बोलत होते.तें पुढे बोलतांना म्हणाले कि,जेव्हा आपण आपल्या शरीराची निगा राखतो
अशावेळी खासकरून पावसाळ्यात दातांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणे फार महत्वाचे ठरते. * स्वस्थ जीवनशैली* गोड पदार्थ किंवा शितपेये टाळा. खासकरून जेवताना ही काळजी नक्की घ्यावी. आम्लपित्तयुक्त अन्न किंवा पेय पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच दात घासण्यापासून टाळा. अॅसिड मुळे दातांची झीज लवकर होते. गोड आणि चिकट अन्न, प्रक्रिया केलेले बाहेरचे उघड्यावरील खाद्यपदार्थ टाळा. हिरव्या पालेभाज्या, चीज, सुक्का मेवा, दूध, जीवनसत्व अ आणि क असलेली फळे खाल्ल्याने दात आणि हिरड्या निरोगी राहण्यास मदत होते.
हे करू नका….
दातांनी बाटलीचे झाकण किंवा कडक वस्तू तोडू नये, दुखापत होते.,
दात हालत असताना दोऱ्याने किंवा हाताने काढू नये त्यामुळे हिरड्या दुखतात.
दात कोरु नयेत, सुई, पिन्स, टाचणी, काडी यांचे सहाय्याने दात कोरू नये असे केल्याने दातांना व हिरड्यांना इजा पोहोचते.
दुधाचे दात पडून गेल्यावर नवीन येणाऱ्या दातांची काळजी घ्यावी.
हे करा-
-दिवसातून दोन वेळा ब्रश आणि टूथपेस्ट वापरून दात स्वच्छ ठेवा.
– खाल्ल्यानंतर प्रत्येक वेळी दातावरून ब्रश फिरवून खळखळून चूळ भरणे
– डेंटल फ्लॉसचा योग्य वापर करणे
– माउथ वॉश वापरून चूळ भरणे
– दंतवैद्याकडे जाऊन योग्य वेळी योग्य तपासणी आणि आवश्यक ती चिकित्सा करून घेणे गरजेचे असते..असे दाता विषयी मोलाचे मार्गदर्शन यावेळी डॉ. संकल्प वायाळ यांनी केले.