21.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

राष्ट्रीय संत मोरारी बापू यांनी परळीत प्रभू वैद्यनाथांचे घेतले दर्शन

राष्ट्रीय संत मोरारी बापू यांनी परळीत प्रभू वैद्यनाथांचे घेतले दर्शन

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले स्वागत व सारथ्य, दर्शनालाही उपस्थिती

मोरारी बापू 12 ज्योतिर्लिंगांच्या यात्रेवर, दोन विशेष ट्रेनने तब्बल 960 जणांसह प्रवास

नमामी वैद्यनाथमच्या जयघोषाने वैद्यनाथ मंदिर परिसर दुमदुमला

परळी वैद्यनाथ (दि. 31) – राष्ट्रीय संत तथा रामचरितमानसचे प्रसिद्ध कथाकार म्हणून देशातच नव्हे तर जगभरात ओळख असलेले मोरारी बापू यांनी आज परळी शहरामध्ये येऊन बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे मनोभावे दर्शन घेऊन पूजन केले. यावेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती होती.

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मोरारी बापू यांचे परळी वैद्यनाथ रेल्वे स्थानकावर स्वागत केले. तसेच स्वतः वाहनाचे सारथ्य करत ते मोरारी बापू यांच्या समवेत वैद्यनाथ मंदिरात दर्शनासही उपस्थित होते.

रामचरितमानस या ग्रंथाचे प्रसिद्ध कथाकार संत मोरारी बापू हे तब्बल 960 भक्तगणांसह देशातील बारा ज्योतिर्लिंगांच्या यात्रेवर असून त्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दरम्यान आज तिरुपती बालाजी येथील दर्शन करून पहाटे सहाच्या सुमारास मोरारी बापू यांची ट्रेन परळी वैद्यनाथ येथे पोहोचली.

धनंजय मुंडे यांनी मोरारी बापू यांना दर्शनासोबतच संपूर्ण मंदिर परिसर दाखवून त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, वैद्यनाथ देवल कमिटीचे बाबासाहेब देशमुख, राजेश देशमुख, प्रदीप देशमुख, विजयकुमार मेनकुदळे, नंदकिशोर जाजू, अनिल तांदळे, डॉ.गुरुप्रसाद देशपांडे, शरद मोहरीर, नागनाथ देशमुख, रघुनाथ देषमुख, अनिल पुजारी, तसेच माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, राजेंद्र सोनी, सुरेश टाक, नितीन कुलकर्णी, रतन कोठारी यांसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी नमामी वैद्यनाथम व हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

लवकरच परळीत रामकथेसाठी येणार – मोरारी बापू

दरम्यान दर्शन करून पुढील प्रवासासाठी रेल्वे गाडीमध्ये बसताना, आपल्याला राम कथेसाठी मंत्री महोदयांनी परळीत येण्याचे निमंत्रण दिले असून, लवकरच कथेसाठी परळीत येणार असल्याची माहिती, स्वतः मोरारी बापू यांनी उपस्थित परळीकरांना दिली

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या