पोदार लर्न स्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे आणि बाळ गंगाधर टिळक यांची जयंती व पुण्यतिथी साजरी
परळी /प्रतिनिधी
राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे आज सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शाळेचे सचीव बद्रीनारायण बाहेती,उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात जयंती व पुण्यतिथी
निमित्ताने प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्वाधीनते बाबतचे जाज्वल्य विचार आणि कणखर बाण्यातून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी स्वातंत्र्यसेनानी,युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. तर तसेच लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणणारे थोर समाज सुधारक,साहित्यरत्न आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे.
राजस्थानीज पोदार लर्न स्कूलचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी,सचीव बद्रीनारायण बाहेती, उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती,अकॅडमीक डायरेक्टर बी.पी.सिंग,प्राचार्य मंगेश काशीद, उपप्राचार्य लक्ष्मण पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते अशी माहिती सहसचिव धीरज बाहेती यांनी दिली आहे.
यावेळी शाळेतील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थीही उपस्थित होते.