14.5 C
New York
Thursday, May 30, 2024

Buy now

spot_img

मनोहर भिडे ही तर भाजपची पिलावळ

मनोहर भिडे ही तर भाजपची पिलावळ

राष्ट्रपित्याचा अवमान काँग्रेस कदापि खपवून घेणार नाही प्रा.अनिल जाधव चा घनाघात

परळी | प्रतिनिधी
देशभरामध्ये गेल्या नऊ वर्षांमध्ये अनेक वाचाळविरांनी महापुरुषाचा अवमान देशभरातील नागरिकाचे मन दुखवण्याचा प्रयत्न केला असून यापूर्वी महापुरुषाचा अवमान करण्याची कुणाची देशात हिम्मत होत नव्हती परंतु देशातील मोदी सरकारच्या या कार्यकाळात महापुरुषांची अवहेलना होत आहे यास सर्वस्वी भाजपा कारणीभूत असून सर्व वाचाळ वीरांना भारतीय जनता पार्टीचे सरकार वाचवत असल्यामुळेच हे असे वारंवार प्रकार करतात तेच करतात स्वतःचे स्वयंघोषित संभाजी नाव ठेवून महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या मनोहर भिडे ने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मुलांबद्दल अपशब्द काढून भारतीय जनता पार्टीचा बोलता धनी असणारा हा भिडे गुरुजी हा भाजपची पिलावळ असून या चाचाळ खोराला काँग्रेस पक्ष कदापी सोडणार नाही आहे पुढे जर याने वारंवार महापुरुषाची अवहेलना केल्यास महाराष्ट्रात भिडे ला कॉंग्रेस फिरू देणार नाही असा घनाघात परळी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रा. अनिल जाधव यांनी केले आहे.

परळी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी केलेल्या आवमानाचा काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला मनोहर भिडे यांनी वारंवार महापुरुषाचा अवमान केला असून याला राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार याची पाठ राखीत आहे याचा बोलता धनी भाजपच असून देशभरात मनिपुर घटनेचे तीव्र पडसाद उमटत असल्यामुळे लक्ष विचलित करण्यासाठी भिडे गुरुजी च्या माध्यमातून महात्मा गांधीच्या अवहेलनेचा विषय पुढे काढत आहे. दुसरीकडे देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशामध्ये गांधीजींच्या पुतळ्या जवळ लोटांगण घालून महात्मा गांधी जिच्या विचारामुळेच भारत देश पुढे जात असल्याची नौटंकी बाहेर देशात करतात परंतु आपल्या भारत देशामध्ये अशा प्रकारे महाराष्ट्रात भाजपाचे सरकार असताना देखील भिडे सारख्या प्रवृत्तीचे लोक अवहेलना करत असतानाही त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई लवकर करून पुढे येत नाहीत भिडे ही भाजपचीच पिलावळ असल्याचे परळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. अनिल जाधव यांनी म्हटले आहे.मनोहर भिडे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितले.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या