21.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

आज मनोज जरांगे पाटलांची निर्णायक इशारा सभा; शाळा महाविद्यालय बंद

बीड — सरसकट आरक्षणासाठी मराठ्यांनी दिलेला 24 डिसेंबर चा अल्टिमेटम संपत आला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी 23 डिसेंबरला बीडमध्ये निर्णायक इशारा सभा घेत सरकारला इशारा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये डेरेदाखल होत आहेत. सभेला मराठवाडा आणि राज्यातून तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त समाज बांधव अबालवृद्ध उपस्थित राहणार आहेत . मनोज जरांगे पाटील व्यासपीठावर आल्यानंतर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली. सभेच्या अनुषंगाने शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी बीडमध्ये निर्णायक इशारा सभा होत आहे. या सभेसाठी लाखो लोक येणार आहेत. यामुळे बीड शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गैरसाेय होऊ नये, यासाठी बीड शहरातील सर्व शाळा बंद ठेवल्या जाणार आहेत.

येणार्‍या समाज बांधवांसाठी पार्किंगपासून आरोग्य सेवापर्यंत सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले.
पाली जवळील पाटील मैदानात मनोज जरांगे पाटील यांची उद्या दुपारी दोन वाजता जाहीर इशारा सभा होत आहे. त्यापूर्वी आज सकाळी या पाटील मैदानातच समाज बांधवांनी पत्रकार परिषद घेत उद्याच्या सभेची माहिती दिली. निर्णायक इशारा सभेच्या माध्यमातून इशारा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील उद्या येत आहेत. ते 22 डिसेंबरच्या रात्री उशीरा बीडमध्ये डेरेदाखल होतील. सभा घेण्याचे ठरल्यापासून समाज बांधवांनी बीड जिल्ह्यासह संभाजीनगर, धाराशीव, जालना, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून 10 लाखापेक्षा जास्त मराठे उपस्थित राहतील. सभेसाठी शंभर एकर जागा आरक्षीत ठेवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. सभास्थळी 300 क्विंटल तांदळाची तर शंभर क्विंटल शाबूदाना खिचडी व फळांची अन्य समाजाने व्यवस्था केली आहे. एक लाख पाणी बॉटल सभास्थळी असणार असून 1200 पेक्षा अधिक स्वयंसेवक उद्या प्रत्यक्ष नियोजनात असणार आहेत. ही सभा अधिक शांततेने, संहितेने संपन्न होणार असून या सभेला अधिक अधिक संख्येने समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
उद्या मनोज जरांगेंचा कार्यक्रम असा आहे
रात्री उशिरा ते बीडमध्ये डेरेदाखल होतील, शहरात आल्यानंतर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जरांगे यांची रॅली निघेल, ती सुभाष रोड मार्गे पुढे कुच करेल. रस्त्यामध्ये मुस्लिम समाज बांधवांकडून त्यांचा सत्कार करण्यात येईल. पुढे ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील, पुढे ही रॅल छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाण येईल तेथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते दर्शन घेतील. तशी ही रॅली बार्शी रोडने पुढे सभास्थळाकडे निघेल. बार्शी नाक्याच्या पुढे मुस्लिम बांधवांच्या वतीने पुन्हा एक सत्कार होईल आणि दुपारी दोन वाजता मनोज जरांगे पाटील हे सभास्थळी असतील.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या