19.3 C
New York
Wednesday, September 18, 2024

Buy now

अडोळी येथे दारूबंदी ग्रामसभा संपन्न.

अडोळी येथे दारूबंदी ग्रामसभा संपन्न.
वाशीम दि.23:-(अजय ढवळे )
येथून जवळच असलेल्या अडोळी या गावातील महिलांनी १२ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कडे अडोळी येथील अवैध रित्या होत असलेली दारू विक्री बंद व्हावी म्हणून विनंती अर्ज दिला होता.त्यानुसार ग्रामपंचायत ने दि.२१ डिसेंबर रोजी दारूबंदी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंचा सविता इढोळे होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपसरपंच भगवान इढोळे, जेष्ठ सदस्य ना.द.इढोळे, माजी सरपंच तथा सदस्य नारायण इढोळे, अन्नपूर्णा तायडे, माजी तंटामुक्त अध्यक्ष अनिल इढोळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती.
सर्व प्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सरपंच सविता इढोळे यांनी पुष्पहार अर्पण केले.नंतर प्रमुख उपस्थिती असलेले राजकुमार पडघान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गावांचा विकास करायचा असेल तर गाव हे वाईट व्यसनापासून दूर असायला पाहिजे.म्हणून आपल्या गावांमध्ये बरेच वर्षांपासून अवैध रित्या सुरू असलेली दारू विक्री बंद असणे आवश्यक आहे.कारण दारूपायी तरुण युवक हे दारूच्या आहारी गेल्याने कित्येकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.त्यामुळे गाव हे दारूमुक्त असणे फार जरुरी चे असणे आवश्यक आहे.
पुढे राजकुमार पडघान यांनी सांगितले की,आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार घालून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे.म्हणून गावातील अवैध रित्या सुरू असलेली दरू विक्री बंद करावी.त्यासाठी संपूर्ण गावांचे सहकारी असले पाहिजे.दारूमुळे गावं विकासापासून कोसो दूर आहे.गावाचा विकास साधण्यासाठी एकोपा व समन्वय असला पाहिजे.
यावेळी श्रीराम इढोळे गजानन इढोळे,व महीला मधून केशरबाई खिल्लारे, सुशिलाबाई इढोळे यांनी देखील दारू पिण्याचे दुष्परिणाम अनुभवातून सांगितले आहे.माणूस हा अधोगतीकडे जात आहे.म्हणून गावातील दारू बंद झाली पाहिजे असे सांगितले.
नंतर ग्रामविकास अधिकारी काकडे यांनी उपस्थितांच्या समोर अवैध दारू विक्री बंदीचा ठराव मांडला.आणि ठरावाला उपस्थितांनी मंजूरात दिली.ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
ग्रामसभेच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन खंडोबा कंट्रक्शनचे चे संचालक प्रमोद इढोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी काकडे यांनी मानले.
ग्रामसभेला गावातील बहूसंख्येने महीला व पुरूषांची उपस्थिती होती.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या