परळी वैजनाथ/प्रतिनिधी
श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर जवळील श्री बजरंग बली वेताळ मंदिर येथे सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी गाणगापूरच्या प्रथेप्रमाणे दुपारी १२ वाजता दत्त जन्मोत्सव उत्साहात झाला. जन्मोत्सवासाठी मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते. श्री गुरुवर्य परमपूज्य विलासनंदजी महाराज यांच्या हस्ते श्रींचे पूजन महाआरती झाली. यावेळी दर्शनासाठी परळी शहर व पंचक्रोशीतून भाविक आले होते. यावेळी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
गाणगापूरच्या प्रथेप्रमाणे दुपारी 12 वा. श्री बजरंग बली वेताळ मंदिर येथे दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्ती पूर्ण व उत्साहात साजरा झाला. आज सोमवारी श्री वेताळ मंदिर येथे दत्त जन्मोत्सव निमित्त श्री विलासानंद महाराज यांच्या हस्ते गुरुंचे, पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी महिला भजनी मंडळांनी भक्तिगीते, भजन गायीले. दत्त जन्मोत्सव निमित्त श्री वेताळ मंदिर सुंदर व आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होती. महाप्रसादाने दत्त जन्मोत्सवाची सांगता झाली.