21.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

चेन्नई इंटरनॅशनल डायमंड फिल्म फेस्टिव्हल मध्ये फायनल तिकीट’ लघुपटास बेस्ट स्टोरी व बेस्ट फिल्म अवॉर्ड

चेन्नई इंटरनॅशनल डायमंड फिल्म फेस्टिव्हल मध्ये फायनल तिकीट’ लघुपटास बेस्ट स्टोरी व बेस्ट फिल्म अवॉर्ड

रानबा गायकवाड यांचे लेखन तर डॉ.सिद्धार्थ तायडेंचे दिग्दर्शन

(परळी प्रतिनिधी)

चेन्नई येथे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर संपन्न झालेल्या इंटरनॅशनल डायमंड फिल्म फेस्टिव्हल 2023 या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये ज्येष्ठ साहित्यिक-पटकथाकार रानबा गायकवाड लिखित आणि सिने-नाटय दिग्दर्शक प्रा.डॉ.सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित “फायनल तिकीट”लघुपटास ‘बेस्ट स्टोरी’ व ‘बेस्ट फिल्म अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे.
फिल्म जंक्शन आयोजित आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये सन्मान प्राप्त “फायनल तिकिट” लघुपटाची निर्मिती-दिग्दर्शन प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे,पटकथा-संवाद रानबा गायकवाड तर छाया-संकलन मनोज आलदे यांनी केले आहे.
या लघुपटात प्रसिद्ध रंगकर्मी प्रदीप भोकरे, शेख गणी,दिवंगत कलावंत शिवकुमार लुले,देविदास बोकन, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ बडे, बा.सो. कांबळे,चंदा चांदणे,कपिल चिंडालिया,गोविंदराव मुंडे, सिद्धेश्वर इंगोले,विकास वाघमारे, विद्याधर सिरसाट, सिद्धांत लांडगे, अनंत सोळंके,सागर चिंडालिया आदींनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत.
हा पुरस्कार स्मृतीशेष शिवकुमार लुले आणि कालकथीत देविदास(बंडू) बोकन यांना आदरांजली स्वरूप अर्पण करीत आहोत अशी भावना पटकथाकार रानबा गायकवाड आणि दिग्दर्शक प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी व्यक्त केली.
यापूर्वी रानबा गायकवाड लिखीत व प्रा.डॉ.सिध्दार्थ तायडे दिग्दर्शित ‘पाण्याखालचं पाणी’ या शॉर्ट फिल्मला गोवा फिल्म फेस्टिव्हल तसेच ‘मांईड इट’ या फिल्म्ला नॅशनल फिल्म डिव्हिजन ऑफ इंडियाचा पुरस्कार,झेप राष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल सोलापूर सन्मान मिळालेला आहे. ‘राधा’ लघुपटास ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल सन्मान,
कोलकाता फिल्म फेस्टिव्हल सन्मान प्राप्त झाले आहेत.या सन्माना बद्दल सर्व स्तरांतून टीम फायनल तिकीटचे स्वागत व अभिनंदन होत आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या