29 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

spot_img

रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला!

मुंबई | वृत्तसंस्था

रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाठवण्यात आली होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नेमणूक केली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी या संदर्भात बैठक घेतली होती. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले फोन टॅपिंगचे दोन खटले रद्द केल्यानंतर तीन महिन्यांहून अधिक कालावधीनंतर त्यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाल्याची माहिती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. एक्सवर पोस्ट करत मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. “महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी श्रीमती रश्मी शुक्ला यांनी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन.!!” असं मुनगंटीवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राज्याचे मंत्री सुधीन मुनगंटीवार यांनी याबाबत एक्सवर पोस्टकरत माहिती दिली असली तरी अधिकृत रित्या याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. शुक्ला यांच्या नियुक्तीमुळे राज्याला पहिल्या महिला पोलिस महासंचालक मिळाल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या.

रजशीश सेठ यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगच्या(MPSC)अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा जोर धरू लागली होती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर हे बुधवारी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी नव्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी या पदासाठी अर्ज केला होता. त्यांच्यासह एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि निवृत्त अधिकारी प्रदीपकुमार यांनी अर्ज केले होते. मात्र, निवड समितीचे प्रमुख मनोज सौनिक यांनी रजनीश सेठ यांची निवड केली. यामुळं रजनीश सेठ यांचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची निवड करण्यात आली आहे.
रश्मी शुक्ला या देखील १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या राज्याच्या पोलीस महासंचालक बनल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळातील कथित फोन टॅपिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारनं त्यांची चौकशी सुरु केली होती. एकनाथ खडसे, संजय राऊत, नाना पटोले, आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत देखील दिली होती. त्या दरम्यानच्या काळात रश्मी शुक्ला या प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये रुजू झाल्या होत्या.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर फोन टॅपिंगच्या प्रकरणातील त्यांच्या विरोधातील चौकशी बंद झाली होती. मुंबई हायकोर्टानं रश्मी शुक्लांच्या विरोधातील फोन टॅपिंग प्रकरणातील याचिका फेटाळून लावल्या होत्या. राज्यात एकनाथ शिंदे यांचं सराकर आल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती.

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळातील कथित फोन टॅपिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारनं त्यांची चौकशी सुरु केली होती. एकनाथ खडसे, संजय राऊत, नाना पटोले, आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आल्याची माहिती तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत देखील दिली होती.

spot_img
spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या