प्रा.टी.पी.मुंडे यांच्या नेतृत्वाखाली समाधान घुगे व युवा कार्यकर्त्यांचा ओबीसी जन मोर्चात जाहीर प्रवेश!
जि. प. सदस्य प्रदीप भैया मुंडे व युवानेते राहुल कराड यांनी केले स्वागत!
परळी वैजनाथ प्रतिनिधी
ओबीसी नेते तथा ओबीसी जन मोर्चाचे उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे (सर ) यांच्या नेतृत्वाखाली समाधान जनार्धन घुगे यांचा ओबीसी जन मोर्चात जाहीर प्रवेश झाला. त्यांच्यासोबत आलेले युवा कार्यकर्त्यांचा प्रवेश संपन्न झाला असून या सर्वांचे स्वागत नागापूर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप भैय्या मुंडे तसेच युवा नेते राहुल कराड यांनी केले.
ओबीसी जनमोर्चा ही ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढणारी सामाजिक संघटना आहे. ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या युवकांनी जन मोर्चामध्ये जाहीर प्रवेश केला. यापुढे आपण प्रा.टी.पी.मुंडे सर यांच्या नेतृत्वामध्ये काम करणार आहोत असा निर्धार युवा नेते समाधान घुगे यांच्यासह युवा कार्यकर्त्यांनी केला. सोनहिवरा नागापूर,अस्वलआंबा तांडा येथील युवकांचा प्रवेश संपन्न झाला.
यावेळी राजेश घुगे, बालासाहेब मुंडे, वैभव घुगे, गणेश पवार, पर्मेश्वर नागरगोजे, मंगेश मुंडे, राहुल जाधव, अभिषेक मोठे, प्रदीप मोठे, ओम मोठे, संतोष शेप, अश्रुबा मुंडे आदी युवकांचा प्रवेश झाला.