स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी
बीड शहरातील कुख्यात आरोपी कडुन तीन गावठी कट्टे व जिवत काडतुसासह आरोपीस स्था.गु.शा. ने केले जेरबंद
बीड : प्रतिनिधी
मा.विशेष पोलीस महानिरीक्षक छ.संभाजीनगर परिक्षेत्र
संभाजीनगर यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणारे इसमांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक बीड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना कारवाई करण्याचे आदेश देवून मार्गदर्शन केले आहे.
दिनांक 03/01/2024 रोजी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे आदेशान्वये वरून अभिलेखावरील पाहिजे व अवैध अग्निशस्त्र बाळगणारे इसमांचा शोध घेत असतांना पोउपनि श्रीराम खटावकर स्थागुशा बीड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इमस नामे सुयोग उर्फ छोटया मच्छिंद्र प्रधान रा.बीड याने विनापरवाना गावठी तीन कटटे विक्रीसाठी आणलेले आहेत. सदर माहितीवरून स्थागुशा बीड यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले. पोउपपि खटावकर यांनी त्यांचे पथकासह पाठक मंगल कार्यालय येथून छोटया प्रधान यास पाटलाग करून ताब्यात घेवून त्याचे ताब्यातील पिशीवीतून तीन गावठी लोखंडी पिस्टल व 04 जिवंत काडतूस असा एकुण 1,24,000/- रु चा मुद्येमाल मिळून आल असून ते जप्त करण्यात आलेले आहेत.
आरोपी नामे सुयोग उर्फ छोटया मच्छिंद्र प्रधान रा. स्वराज्य नगर ह.मु.क्रातीनगर बीड याचे विरुध्द पुर्वी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी व आर्म् ॲक्ट चे गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्या द्ष्टीने तपास चालु असून आरोपी विरुध्द पो.ठा.बीड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. पुढील तपास पो.ठा. बीड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा,बीड येथील अधिकारी व अंमलदार करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री.नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक, बीड, श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक,बीड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.श्री. संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/मनोज वाघ, प्रसाद कदम, पोना/विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, पोशि/सचिन आंधळे, पोह/देविदास जमदाडे, पोशि/विकी सुरवसे, नारायण कोरडे, चालक/ अशोक कदम, स्था.गु.शा.बीड यांनी केली आहे.