ऐतिहासिक पराक्रम लढ्याचा भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ साक्षीदाराचे प्रतीक. पंडितभाऊ दाभाडे
_____________________
शौर्य दिनानिमित्त भिमसैनिकांना बहुजन जनता दला कडुन भोजनदान
_____________________
पुणे दि. एक जानेवारी १८१८ रोजी हा दिवस जगातील सर्वात भयंकर लढाई म्हणून नोंदविलेली पुणे भीमा कोरेगाव येथे ५०० महार भीमसैनिक विरुद्ध २८००० दुसरा बाजीराव पेशव्याच्या सैन्यात झालेल्या ऐतिहासिक व पराक्रमा लढ्याचा भीमा कोरेगाव येथील हा विजयस्तंभ साक्षीदाराचे प्रतीक आहे ५०० महार भिमसैनिकांनी २८००० हजार पेशव्याच्या सैनिकांना ठार मारून जुलमी पेशवाईचा अंत केला होता.आमचा मान सन्मान अभिमान आणि शान तर ऐतिहासिक पराक्रम आणि बलिदानाचे विजयस्तंभ साक्षीदाराचे प्रतीक आहे असे प्रतिपादन बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी केले
बहुजन जनता दल रयत कष्टकरी कामगार संघटना कामगार कल्याण संघर्ष सेना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 1 जानेवारी रोजी पुणे नगर रोडवरील वाघेश्वर मंदिर चौक पंपिंग जवळ वाघोली पुणे येथे शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीमसैनिकांना मोफत भोजनदानाचे आयोजन बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे रयत कष्टकरी कामगार संघटना अध्यक्ष अलकाताई रणधीर कामगार कल्याण संघर्ष सेनेचे अध्यक्ष दिनेश भाई चॅनल यांनी केले होते तेव्हा बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे बोलत होते
भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी बहुजन जनता दल रयत कष्टकरी कामगार संघटना.कामगार कल्याण संघर्ष सेना यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असे अलकाताई रणधीर आणि दिनेशभाऊ चनाल यांनी कळविले
ऐतिहासिक पराक्रम लढ्याचा भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ साक्षीदाराचे प्रतीक. पंडितभाऊ दाभाडे
https://atulyamaharashtra.com/