मराठी पत्रकार परिषद व परळी पत्रकार संघाच्या वतीने आज दर्पण दिनाचे आयोजन
परळीतील पत्रकारांना होणार आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे’ वितरण
परळी, (प्रतिनिधी)
मराठी पत्रकार परिषद परळी शाखा व परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने वतीने पत्रकारांना दर्पण दिना निमित्त ‘आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे’ वितरण करण्यात येणार आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे पत्रकार भवन येथे सकाळी 10 वा. हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास सर्व संपादक, पत्रकार बंधू भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषद मुंबई शाखा परळी, मूकनायक संयोजक समिती परळी, परळी शहर व तालुका पत्रकार संघ, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मीडिया परिषद परळी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी 6 जानेवारी रोजी दर्पण दिन कार्यक्रमाचे आयोजन परळी शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने केले जाते. गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन या ठिकाणी सकाळी 10 वा. दर्पण दिन व याच ठिकाणी आयुष्यमान भारत कार्डची प्रक्रिया तसेच कार्डचे वितरण केले जाणार आहे. सर्व संपादक, मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व सदस्यांनी, तसेच पत्रकार बंधू भगिनींनी आपल्या सोबत आपले आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे. कार्यक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन परळी शहर व तालुका पत्रकार संघ, मूकनायक संयोजक समिती परळी, मराठी पत्रकार परिषद मुंबई शाखा परळी, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मीडिया परिषद शाखा परळी च्या वतीने यांनी केले आहे.