4.2 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

ढाकणे परिवारातील विवाह सोहळा थाटात संपन्न

ढाकणे परिवारातील विवाह सोहळा थाटात संपन्न

लातूर/ प्रतिनिधी

भारतीय संस्कृतीत संस्काराला खूप महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत जे सोळा संस्कार सांगितले आहेत, त्यापैकी पंधरावा संस्कार म्हणजे ‘विवाह’.
ढाकणे परिवार म्हणजे एक नामांकित परिवार.
सर्वांच्या सुखा-दु:खामध्ये सहभागी होणारा परिवार.वैद्यकीय आणि न्यायालयीन प्रक्रियेत सर्वांना वेळोवेळी मदत करणारा परिवार आणि ह्या परिवारातील विवाहसोहळा संपन्न झाला.
परळी वैजनाथ येथील स्मृतीशेष डॉ. श्यामराव ढाकणे यांची नात व ॲड.आशिष ढाकणे यांची पुतणी डॉ.ऐश्वर्या ढाकणे आणि इंजि.सूरज तेरकर यांचा शुभविवाह लातूर येथील ओम हामने पॅराडाईज वेडिंग हॉल मध्ये दि. ६ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यात वधू वरांना शुभाशीर्वाद देताना
मंत्री नामदार संजय बनसोडे, आ. विक्रम काळे , माजी आ शिवाजीराव कव्हेकर, निलेश देशमुख ,केदार सारडा, मारोती कदम, संतोष जोगदंड ,डॉ नामदेव आघाव, भगवान साकसमुद्रे, गुलाम मुजीब उर्फ बबलू, संतोष नायर ,भास्कर सोनवणे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, न्यायालय,उद्योग आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या