14.5 C
New York
Thursday, May 30, 2024

Buy now

spot_img

परळीतील वाहतूक समस्यांच्या उपाय योजनासाठी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस सरसावले

परळीतील वाहतूक समस्यांच्या उपाय योजनासाठी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस सरसावले

परळी /प्रतिनिधी- परळी शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे नागरिकांना अनेक अडचणीचा सामना गेल्या कित्येक वर्षापासून करावा लागत आहे.परळी शहरातील वरदळीच्या ठिकाणी टू व्हीलर व फोर व्हीलर मधून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरतच बनली आहे. परळी शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम लागणार असून नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन परळी शहरातील वर्तुळाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी लवकरच कारवाईचा बडगा उगारणार असल्याची माहिती संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरांतर्गत आणि बाजारपेठेतील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच्यावर उपाय म्हणून पी वन पी टू या पार्किंग प्रणालीचा शहरात पुनश्य लागू करण्याचा विचार व्यापारी आणि पोलीस प्रशासन बसून घेणार आहे. अवजड रस्त्यावर उभे असलेल्या वाहनाला स्टिकर लावून त्या वाहनावर कारवाई करावी. वाहनाची पार्किंग वाहन तळावरच करावी. इतरत्र वाहणे पार्क करू नयेत. ब्रिजवर कॅमेरासमोर बॅनर लावण्यात आले आहेत. बॅनर काढून घ्यावेत तसेच व्यापाऱ्यांनी टावर ते एकमिनार चौक येथील अस्ताव्यस्त उभारलेली वाहने काढण्यासाठी पोलीस प्रशासना सहकार्य करावे. दुकानदारांनी जड वाहने रात्रीच्या वेळी खाली करावे व भरावेत जेणेकरून रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी.अन्यथा बुधवार दि.10 जानेवारी 2024 पासून वाहातुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनावर दंड आकारला जाईल अशी माहिती संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी बैठकीत दिली.

तीन दिवस नागरिकांना ध्वनी क्षेपणावरून सूचना देण्याचे काम केले जाणार असून यानंतर कारवाईचा भडगाव उभारण्यात येणार आहे. भाजी बाजार शहरातील महत्त्वाच्या बँका यांच्यासमोर मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या पार्किंग मुळे पादचारी नागरिकांना चालणे दुरापास्त होते. एक मिनिटात आलो दोन मिनिटात आलो म्हणून गाडी दुकानासमोर उभी करणारी माणसं १० मिनिट येत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात ही सवय मोडीत काढण्यासाठी अशा एक मिनिट दोन मिनिट वाल्यांना दंड लावला जाणार असल्याचे या बैठकी त सलीमच्या चाउस म्हणाले. तर शहरात येणारा माल रात्री आठ ते सकाळी आठ या वेळात उतरवला किंवा चढवला जावा या संकल्पनेचाही विचार चालू आहे. दुचाकी चार चाकी आणि अवजड वाहनधारकांनी आपली वाहणे आपल्या जागेत पार्क करावेत, रस्त्यावर आल्यावर त्याचा वाहतूक यंत्रणेवर ताण पडणार नाही, पादचारी नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

या बैठकीस संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड, नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे, वाहतूक शाखेचे इन्चार्ज अनिल शिंदे,  जाधव, एपीआय जाधव, मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वयक धनंजय आरबुने, आदिसह परळी शहरातील व्यापारी, नागरिक, पत्रकार तसेच परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

spot_img
spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या