22.6 C
New York
Friday, April 25, 2025

Buy now

श्री रेणुकामाता मल्टिस्टेट येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा

श्री रेणुकामाता मल्टिस्टेट येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा

परळी : अतुल्य महाराष्ट्र न्युज

सर्वत्र ६ जानेवारी हा दिवस ” दर्पण दिन ” म्हणून साजरा केला जातो. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण नावाचे प्रथम वृत्तपत्र सुरू केले होते. त्यानिमित्त त्या दिवसाची आठवण म्हणूनच ”दर्पण दिन” साजरा केला जातो.श्री रेणुका माता मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह बँक सोसायटी परळी वैजनाथ येथे परळी शहरातील सर्व पत्रकार बांधवांना दर्पण दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे स्वागत करण्यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परळीतील सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थिती दर्शवली यावेळी जेष्ठ पत्रकार आणि मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वयक धनंजयजी अरबुने , दैनिक आदर्श गावकरीचे,बीड संकेतचे तालुका प्रतिनिधी जगदीशजी शिंदे , दैनिक अतुल्य महाराष्ट्राचे मुख्य संपादक नितीन ढाकणे , पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पत्रकार अमोल सूर्यवंशी (दैनिक अतुल्य महाराष्ट्र) यांचा श्री रेणुकामाता मल्टीस्टेट च्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी शाखा व्यवस्थापक तोडकरी जी.व्ही सहाय्यक शाखा व्यवस्थापक शैलेश वैजवाडे, कॅशियर समशेट्टी, लिपिक सुरेश मुंडे ,सेवक चव्हाण त्याचबरोबर बँकेतील सर्व स्टाफ उपस्थित होता. यावेळी बँकेच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला या सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुका माता मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह बँक सोसायटीचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक वैजवाडे शैलेश यांनी केले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या