नंदागौळ येथील वंचित रेशन कार्डधारकांची ऑनलाईन नोंद 20 जानेवारी पर्यंत करण्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे साहेबांचे लेखी आश्वासन !
तहसीलदारांच्या लेखी आश्वानसामुळे उद्याचे उपोषण तात्पुरते स्थगित – सुंदर गित्ते
परळी(प्रतिनिधी)परळी तालुक्यातील नंदागौळ येथील सुमारे 112 कार्डधारकांची ऑनलाईन नोंदणी मागील 4 महिन्यापासून कागदपत्रे देऊन सुद्धा होत नसल्याने उद्या सोमवारी 08 जानेवारी रोजी गावकऱ्यांसह तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सरपंच सुंदर गित्ते यांनी दिला होता,या आंदोलनाची दखल घेत,परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी नंदागौळचे सरपंच सुंदर गित्ते यांना लेखी आश्वानस दिले असून येत्या 20 जानेवारी पर्यंत सर्व 112 वंचित रेशन कार्डधारकांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार असून उपोषणा पासून परावृत्त होण्याची विंनती केली असून त्या विनंतीस मान देऊन उद्या सोमवार दिनांक 08 जानेवारी 2024 चे आमरण उपोषण तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा सरपंच सुंदरभाऊ गित्ते यांनी केली असून जर दिलेल्या मुदतीत हि ऑनलाईन नोंदणी नाही केली तर त्यानंतर तहसीलदारांच्या दालनात कार्डधारकाना घेऊन बसण्याचा इशारा सुद्धा यावेळी त्यांनी दिला आहे.